गोवा खबर

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडून नाताळाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीयांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या आनंदमयी प्रसंगी, मी सर्व नागरिकांना विशेषतः ख्रिश्‍चन बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आपल्या संदेशात राज्यपालांनी म्हटल आहे की, नाताळ सण हा येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. नाताळ सण हा बंधुत्वाचा सण आहे. त्याग, प्रेम, एकोपा, कृपाळूपणा आणि शांती यांच्या आचरणाद्वारे आनंदात सहभागी करून घेण्याचा संदेश या सणाद्वारे दिला जातो. हा पवित्र सण साजरा करीत असताना, आपण प्रत्येकाला मदतीचा हात देऊन येशू ख्रिस्तांच्या प्रेम आणि क्षमाशीलता या शाश्‍वत संदेशाचे अनुकरण करायला हवे.
आपली सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने, बंधुभाव आणि आनंदाने साजरे करण्याची भारताची परंपरा आहे. ही परंपरा बळकट करण्याचा नाताळ सण हा एक पवित्र सण आहे असेही राज्यपाल श्री पिल्लई यांनी म्हटल आहे.
या प्रसंगी, सर्वांना समाधान लाभो आणि राज्याचा विकास होवो यासाठी मी प्रभू येशूंपाशी प्रार्थना करतो असे सांगून त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या मातृभूमीच्या प्रगतीसाठी आपण आपले प्रयत्न आणि सर्व शक्ती वापरून राज्याच्या समृध्दीसाठी एकसंध होऊया.

Trending

Exit mobile version