गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोमंतकीयांना नाताळाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love
गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला, खासकरून ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या आनंददायी समयी, मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, की “नाताळ हा आनंदाचा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताचे स्मरण करून, शांतता आणि सौहार्दाची भावना जागृत करण्याचा दिवस आहे. या प्रसंगी, आपण त्याग, प्रेम, सहिष्णुतेचा मौल्यवान संदेश पसरवणाऱ्या आणि साधेपणा, दया या उदात्त गुणांचा उपदेश करणाऱ्या प्रभू येशूचे मनापासून स्मरण करुया.”
“गोव्यात, बहुधर्मिय समाज असूनही, एकतेने राहण्याची आमची गौरवशाली परंपरा आहे. ख्रिसमस हा सण राज्यातील हे बंधुत्वाचे बंध, अधिक मजबूत करतो आणि आपल्याला सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्यास मदत करतो. आज एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत असताना, आपण सर्व एकत्र येऊन समृद्ध गोवा घडवण्याच्या दिशेने वाटचाल करूया,” असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “हा पवित्र सण साजरा करताना, आपण सर्वांसाठी मदतीचा हात पुढे करून, प्रभु येशू ख्रिस्ताने दिलेल्या शांतीच्या संदेशाचे अनुकरण केले पाहिजे. गरजूंना मदत करण्यासाठी समर्पित भावनेने हात पुढे करणे, निराश लोकांना आशा देणे, समुदायांमधील मानवतेचे समर्थन करणे, हा संदेश ख्रिसमसचा सण प्रतिबिंबित करतो.”
मुख्यमंत्री शेवटी आपल्या संदेशात म्हणतात, कि “नाताळच्या आगमनाने सर्वांना चांगले आरोग्य लाभू देत तसेच विकास आणि जातीय सलोखा पसरू दे. आपण एकमेकांमधील बंधुभाव अधिक दृढ करून, राज्याच्या वैभवासाठी कार्य करण्यास स्वतःला झोकून देऊया. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात अमर्याद आनंद घेऊन येत राहो. सर्वांना नाताळच्या आनंददायी शुभेच्छा.”

Trending

Exit mobile version