पक्षाचा विस्तार करण्याविषयी दोन्ही नेत्यांत चर्चा
गोवा खबर:गोव्याचे राज्यसभा खासदार तसेच गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री सदानंद शेत तानावडे यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगात प्रकाश नड्डा जी यांची भेट घेऊन मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमधील निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान श्री नड्डा जी यांचे नेतृत्व व प्रचारकार्यातील त्यांचा महत्वाचा स हभाग या दोन्ही घटकांनी भाजपाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलल्याचे मत श्री तानावडे यांनी व्यक्त केले. तेलंगणामधील भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्या निमित्त देखील श्री तानावडे यांनी नड्डा यांचे अभिनंदन केले.
गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने श्री तानावडे यांनी गोवा भाजपाची सद्यस्थिती व संघटनात्मक पैलूंबद्दल श्री नड्डाजीशी चर्चा केली. यावेळी पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाची तळागाळातील पोहोच वाढविण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला.
श्री. सदानंद शेट तानावडे यांनी श्री जगतप्रकाश नड्डाजीना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा जिंकण्यासाठी जोमाने काम करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.