गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा-२०२४ मध्ये गोमंतकीय दिव्यांगजनांना आपली निर्मितीकौशल्य सादर करण्यासाठी निमंत्रण

Published

on

Spread the love
गोवा खबर: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा-२०२४ मध्ये गोमंतकीय दिव्यांगजनांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी तसेच आपली उत्पादने यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. 
यंदा महोत्सव जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय यावर्षी केंद्रीय दिव्यांगजन सबलीकरण खाते पाठबळ मिळणार आहे. यामुळे आपले कौशल्य, आपली उत्पादने व अन्य गोष्टी सादर करण्यासाठी गोमंतकीयांसाठी महोत्सव उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. याचा लाभ राज्यातील दिव्यांगजनानी घ्यावा असे आवाहन राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी केली आहे.
८ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत, पणजी-गोवा येथे नियोजित हा महोत्सव राज्य दिव्यांगजन आयोग, राज्य समाजकल्याण संचालनालय आणि केंद्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. यामध्ये जगभरातील लोकांचा सहभाग असणार आहे.
यावेळी महोत्सवात नऊ आकर्षक विभाग असून प्रत्येक विभागाची रचना ही दिव्यांगजनांप्रती जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. यामध्ये पर्पल कन्व्हेन्शन्स, पर्पल थिंक टँक, पर्पल एक्स्पिरियन्स झोन, पर्पल एक्झिबिशन, पर्पल फन, पर्पल रेन, पर्पल कॅलिडोस्कोप, पर्पल स्पोर्ट्स आणि पर्पल स्पेक्ट्रम या विभागांचा समावेश आहे.
आरोग्य, शिक्षण, रोजगार, लिंगसमानता आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर चर्चासत्रसह क्रूझ राइड्स, बर्ड ट्रेल्स, चित्रपट प्रदर्शन, ड्रम सर्कल आणि स्टारगेझिंग अशा मनोरंजनात्मक उपक्रमांचा समावेश आहे.  एक्सपिरिअन्स झोनमधून दिव्यांगजनांचे आयुष्य, त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे मत जाणून घेण्याची संधी लोकांना  मिळणार आहे. तसेच या महोत्सवामध्ये दिव्यांगजनांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवात सहभागासाठी तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा – ७९७२०४४८७८/ ९८८१९६०३३५.

Trending

Exit mobile version