गोवा खबर:नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाने महसूल सचिव श्री. संदिप जॅकीस यांची गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. १ जानेवारी २०२४ ही पात्रता तारीख म्हणून सध्याच्या मतदार यादीची विशेष सारांश पुनरावृत्ती चालू आहे.
मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदगृहात उपलब्ध असेल. तसेच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक २०५, तिसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१ येथे त्यांच्या कार्यालयांत संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी फोन क्रं. ०८३२-२४१९४२०, २४१९६४६ वर संपर्क करू शकतात.