गोवा खबर : सर्वोत्तम क़ामगिरीवर १०० टक्के भर दिल्यानेच यश संपादन करणे शक्य झाले असे नुकत्याच पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वाय मार्शल आर्टप्रकारात गोव्याची सुवर्णपदक विजेती प्रांजल प्रशांत नाईक हिने सांगितले आहे. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने २७ सुवर्ण, २७ आणि ३८ कांस्य अशी एकूण 92 पदके जिंकली.
खोर्ली येथील रहिवासी असेलली नाईक म्हणाली की, तिने खूप प्रयत्न केले आणि तिला यश मिळाले. गेल्या तीन महिन्यांपासून मी कासावली क्रीडा संकुलात दररोज सराव केला. मी फक्त माझे १००% देण्यावर लक्ष केंद्रित केले होते. हीच माझी मानसिकता होती आणि त्यामुळेच सुवर्णपदक जिंकता आले, असे ती म्हणाली.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
नाईक पुढे म्हणाली की, मार्शल आर्ट महिलांसाठी महत्वाचा आहे कारण त्याचा वापर स्वसंरक्षणासाठी केला जाऊ शकतो. मी इयत्ता सहावीत असल्यापासून स्क्वे मार्शल आर्टस् शिकायला सुरुवात केली. कराटे, बॉक्सिंग आणि अॅक्शनशी संबंधित इतर खेळांकडे माझा नेहमीच कल होता. मला असे वाटते की मार्शल आर्टमुळे मुली आपले संरक्षण सुनिश्चित करू शकता. कारण ही कला आत्मसात केल्यास त्या एकट्या सुरक्षित राहू शकतात. त्या स्वत:हून कुठेही जाऊ शकतात, असे ती म्हणाली.
नाईक यांच्या आईनेही आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आजारपणावर मात करून तिने कठोर परिश्रमासह सराव केला आणि आपला अभ्यास सांभाळला, असे तिच्या आईने सांगितले.