Uncategorized

ई-बाजार, मार्केटिंगला चालना देण्यासाठी एक निर्णायक पाऊल: प्रकाश नाईक, माहिती अधिकारी

Published

on

Spread the love

मार्केटिंगला बळकटी देण्यासाठी ई-बाजारची मोलाची साथ

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे हे जग म्हणजे, एक जागतिक गाव बनले असून लोकांना अगदी वेगाने माहिती मिळत आहे. जगभरात घडणाऱ्या ताज्या घडामोडींचीही यथोचित माहिती मिळत आहे. डिजिटायझेशनच्या आगमनाने संधी उपलब्ध झाल्याने, ग्राहकांचे समाधान होते आणि कर्मचाऱ्यांची उत्पादकता देखील वाढते. ही बाब लक्षात घेऊन, आपल्या जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या राज्य सरकारने, ई-बाजार सुरू करण्यास सुरुवात केली आहे. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत डिजिटल उपक्रमाद्वारे गोव्यातील उद्योजक आणि बचत गटांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेली, ही एक अभिनव कल्पना आहे.

ई-बाजार हे विपणन (मार्केटींग) स्वयंरोजगार आणि वाढत्या बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी उचललेले एक निर्णायक पाऊल आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या गणेश चतुर्थी दरम्यान, ई-बाजारचे यश दिसून आले, ज्यामध्ये महिला बचत गट आणि लहान उद्योजकांनी ८०० हून अधिक ऑर्डर्ससह या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऑनलाइन सेवा ही इंटरनेटसह एखाद्याला घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून विविध सेवांमध्ये प्रवेश करण्याची सोय प्रदान करते. ही सेवा प्रत्यक्ष प्रवासाची गरज काढून टाकते आणि वापरकर्त्यांना २४/७ सेवेचा लाभ घेण्याची परवानगी देते.

ई-बाजार सुरू करणे ही काळाची गरज होती, असे आपण म्हणू शकतो, कारण यामुळे गोव्यातील ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांच्या सक्षमीकरणाच्या नव्या युगाचा मार्ग मोकळा होईल. रोजगाराच्या दृष्टीने कृषी क्षेत्र, हे भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे उद्योगक्षेत्र आहे व या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरते.  कृषी क्षेत्र १५१ दशलक्षाहून अधिक लोकांना उपजीविका मिळवून देते. भारतीय लोकसंख्येपैकी अंदाजे ६० टक्के लोक उद्योग क्षेत्रात काम करतात. भारतीय लोकसंख्येपैकी ५८ टक्के लोक, उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. गोव्यातही, राज्यातील ३५ टक्के लोकसंख्या अंशतः किंवा पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे.

ADVT :दीपावली निमित्त जगातील सर्वात मोठी 9 वी अखिल गोवा आकाश कंदील स्पर्धा 10 नोव्हेंबर 2023 रोजी पर्रा येथे.अखिल गोवा बरोबर कळंगुट आणि शिवोली मतदार संघातील विजेत्यांना मिळणार हजारो रूपयांची बक्षीसे..सहभागी व्हा..बक्षीसे जिंका!

ई-बाजार सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी विशेषत: डोंगराळ भागात उत्पादन घेणाऱ्या आणि घरगुती उत्पादनांसाठी, त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यास योग्य विपणन सुविधा उपलब्ध नव्हत्या. परिणामी, कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी शासनाचे विविध कार्यक्रमांद्वारे नवीन उपक्रम/उपाय असून देखील, शेतकरी समुदायाकडून त्याला फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत नव्हता. ई-बाजार सुरू करण्याचा हा प्रयत्न शेतकरी आणि उद्योजकांसाठी वरदान ठरेल. यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर शेतीविषयक उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा मिळेल. शिवाय त्यांची उपजीविका टिकवून उरेल आणि उत्पादनावर चांगला परतावा मिळेल. शेतकरी, महिलांसह सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सरकारच्या नवनवीन उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान आणि ज्ञानाने स्वत:ला परिपूर्ण बनविण्यासाठी व त्याचा लाभ ग्रामीण जनतेच्या दारात पोहोचवण्यासाठी, पुढे येण्याची हीच योग्य वेळ आहे.

चतुर्थी ई-बाजार उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या राज्य सरकारने, आता दसरा सणानिमित्त स्वयंपूर्ण ई-बाजार सुरू केला आहे, जेणेकरून गोव्याचे खाद्यपदार्थ, हस्तकला व इतर वस्तूंच्या भारतभर विक्रीसाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध होईल. या उपक्रमांतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्याचीही सरकारची योजना आहे. या प्रयत्नामुळे मार्केटिंगला मोठ्या प्रमाणात चालना देण्याबरोबरच, सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास  मदत होईल. विशेषतः राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये स्वयंरोजगाराला चालना देण्यास हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल.

Trending

Exit mobile version