गोवा खबर:मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने “माझ्या देशासाठी माझे मत” या संकल्पनेस चालना देण्यासाठी निवडणुकीच्या विषयावर ‘इको फ्रेंडली’ आकाशकंदील स्पर्धेचें आयोजन केले आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपल्या तपशिलासह (नांव, स्थळ, संपर्क क्रमांक) ceo_goa@eci.gov.in या ई-मेलवर नोंदणी करावी.
#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 3 नोव्हेंबर 2023 चे वेळापत्रक
ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. नोंदणी पुर्णपणे मोफत आहे आणि स्पर्धेत भाग घेण्यास शुल्क नसेल. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपला ‘इको फ्रेंडली’ आकाशकंदील १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुपुर्द केले पाहिजे.
आकाशकंदील ‘इको फ्रेंडली’ आणि निवडणूक विषयावर आधारित असावा. स्पर्धेचे पहिले बक्षिस रोख १०,०००/- रूपया, दुसरे ५,०००/- रूपया आणि तिसरे ३,०००/- रूपये तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आहे. अधिक माहितीसाठी इव्हेंट समन्वयक दिपेश दळवी (9689052423) यांच्याकडे संपर्क साधावा.