गोवा खबर

राजभवन येथे जम्मू, काश्मीर आणि लडाख स्थापना दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:दोना पावला येथील राजभवनातील दरबार सभागृहात जम्मू, काश्मीर आणि लडाख स्थापना दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल श्री. पी.एस.श्रीधरन पिल्लई उपस्थित होते.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 1 नोव्हेंबर 2023 चे वेळापत्रक

देशभरात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून स्थापना दिवस साजरा केला जातो.

श्रीमती. रीटा श्रीधरन यांनीही यावेळी उपस्थिती लावली.

स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी जग हे आमचे कुटुंब असून आपण एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वत:ला स्वीकारा, स्वत:वर प्रेम करा आणि पुढे जात राहा असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी जम्मू, काश्मीर आणि लडाख राज्यांना शुभेच्छा देताना  या दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि त्यांच्याकडे प्रतिभा आहे असे सांगितले.

सुरवातीस राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्री संदेश गडकरी यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती. श्रेया गुरव यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version