गोवा खबर

दिव्यांग व्यक्तींसाठी समान संधी धोरण अधिसूचित करण्याची सक्ती

Published

on

Spread the love

 गोवा खबर: दिव्यांग  व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६ प्रमाणे प्रत्येक आस्थापनाने कायद्यातील तरतुदीस  अनुसरून प्रस्तावित उपाय योजनेविषयी  तपशीलवार समान संधी धोरण सूचित करून या  धोरणाची प्रत राज्य आयुक्तांकडे नोंद करण्याची गरज आहे. तसेच अस्थापनानी समान संधी धोरण आपल्या वेबसाईटवर प्रदर्शित केली पाहिजे, असे समाज कल्याण संचालनालयाने कळविले आहे.  

सरकारी आस्थापनासह वीस किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी अस्थापनामघ्ये समान संधी धोरणा प्रमाणे  दिव्यांग व्यक्तींला अस्थापनामध्ये त्यांची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास मिळावी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. तसेच अस्थापनामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विविध पदांची यादी आणि भरती तसेच  प्रशिक्षण, प्रोमोशन,  बदली,  नियुक्ती, विशेष रजा, निवास व्यवस्था असल्यास वितरीत करतना प्राधान्य देण्याबाबत निकष ठरविले पाहिजे.

तसेच अस्थापनामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक उपकरणें, अडथळा मुक्त प्रवेश योग्यता आणि इतर सुविधा उपलब्ध करणे, दिव्यांग व्यक्तींच्या भरतीसाठी अस्थापनांच्यावतीने संपर्क अधिकारी नियुक्त करणे,  अशा सुविधांची  तजवीज करणे आवश्यक आहे.

Trending

Exit mobile version