गोवा खबर:राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या सणानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसरा म्हणजे विजयादशमी जो हिंदूचा एक महत्त्वाचा सण आहे.दसऱ्यांच्या उत्साहाने नवरात्रीची समाप्ती होते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सवाचे प्रतिक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्री रामाने रावणावर मिळविलेल्या विजयाच्या आणि देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसावर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणूनही साजरा केला जातो.
दसरा सण आपल्याला धर्म (नीति) आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो याची आपल्याला आठवण करून देणारा हा दिवस. हा सण आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करतो आणि विविधतेतील एकता या संकल्पनेतील आपला अढळ विश्वासाला पुष्टी देतो.
या शुभ प्रसंगीआम्ही आपल्या समाजात प्रेम, दया, करुणा आणि सहिष्णूतेचा प्रसार करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा समर्पित करण्याची शपथ घेऊया.
या वर्षाचा दसरा सण आपण सर्वांना आनंद, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.