गोवा खबर: नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने फोर्टिफाइड तांदूळबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. स्वस्त धान्य दुकानाद्वारे “प्लास्टिक तांदूळ” विकल्या जात असल्याबद्दल सोशल मीडियावर तसेच स्थानिक वृत्तपत्रावर चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित झाल्याची माहिती आहे. त्याबाबत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अन्नांतून लोकांना पौष्टिक आहार आणि व्हिटामिन्स मिळावी यासाठी सरकारच्यावतीने स्वस्त धान्य दुकानांतून फॉर्टीफाईड तांदुळ वितरीत करण्यात येतो. फॉर्टीफाईड तांदळांमध्ये व्हिटॅमिन बी १२, फॉलिक अॅसिड , लोह आणि तांदळाचा पावडर असतो. शिजविलेल्या भातात ८०% स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण असते. तसेच त्यामध्ये चिकटपणा असतो. परंतु हे तांदूळ प्लास्टिकचे नसतात.
फॉर्टीफाईड तांदूळ साठवून ठेवता येतात, रूचीकही लागतात आणि दररोजच्या तांदळांप्रमाणे शिजविण्यास येतात. त्यासाठी लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. असे नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने कळविले आहे.