गोवा खबर:२४ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यांत संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करण्यात येणार आहे. यादिनी राज्याची राजधानी आणि जिल्हा मुख्यालयातील ज्या इमारतीवर नियमित राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो त्या सर्व इमारतीवर राष्ट्रीय ध्वजासोबत संयुक्त राष्ट्राचा ध्वज फडकविला जाईल .
पणजी आणि जिल्हा मुख्यालयातील जी सरकारी खातीं, कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने नियमीतपणाने राष्ट्रीय ध्वज फडकवितात त्यांनी २४ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय ध्वजासोबत संयुक्त राष्ट्राचा ध्वज फडकविला पाहिजे असा आदेश दिला आहे.
परंतु संयुक्त राष्ट्राचा ध्वज राजभवन इमारत किंवा राजनिवास, विधीमंडळ इमारत, विधानसभा आणि उच्च न्यायालय इमारतीवर फडकविण्यात येणार नाही.