गोवा खबर:गोव्यातील कॉर्पोरेट (CSR) सामाजिक जबाबदारीच्याप्रयत्नांना बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अथॉरिटी यांनी सामंजस्य करारावर कांपाल, पणजी येथील आरोग्य सेवा संचालनालयात सह्या केल्या.
सीएसआर कायद्यानुसार कॉर्पोरेशनने त्यांच्या नफ्यातील २% सीएसआर उपक्रमांसाठी वाटप केले. गोवा सीएसआर प्राधिकरण हे चॅनल म्हणून काम करते ज्याद्वारे हा निधी विविध सरकारी खात्यांमधील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वापरला जातो. नियोजन आणि सांख्यिकी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गोव्यातील सीएसआर प्राधिकरणाचे संयुक्त सीईओ श्री विजय सक्सेना यांनी हे प्रकल्प गोवा समुदायाच्या फायद्यासाठी डिझाइन केलेले आहेत यावर भर दिला. गोवा उडुपी येथील प्रसाद नेत्रालयाकडून १.१६ कोटी रक्कम योगदान देम्यात आले जी “सर्वांसाठी व्हिजन” उपक्रमासाठी देण्यात आली आहे. या उपक्रमाने आधीच सुमारे २३०,००० मुलांची नेत्रतपासणी केली आहे असेही श्री सक्सेना म्हणाले.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मोपा सबस्टेशनमधून गोव्याला ९०% वीज पुरवण्यासाठी जबाबदार आहे, २७५ सबस्टेशन्स आणि १७५,००० किलोमीटर पेक्षा जास्त ट्रान्समिशन लाइन्ससह विस्तृत नेटवर्कचा दावा करते. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री शंकरा बीआर राव यांनी येत्या दोन वर्षात सहकार्यावर लक्ष केंद्रित करून आरोग्य क्षेत्रासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले.
स्वाक्षरी कार्यक्रमास पीजीसीआयचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक श्री बी.एल.कुमरे, आरोग्य सेवा संचालनालयाचे लेखा संयुक्त संचालक श्री किसन गावडे आणि आरोग्य सेवा संचालनालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डीएचएसच्या सार्वजनिक आरोग्य उपसंचालक डॉ.रुपा नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. आदिती बुडकुले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.