गोवा खबर

समाजाने मुलीना समानतेची वागणूक दिली पाहिजे: गित्ते

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: कोणत्याही भेदभावाशिवाय मुलीच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी मुलीला पाठिंबा द्यायला हवा आणि समाजाने मुलीशी समानतेने वागले पाहिजे असे प्रतिपादन उत्तर गोवा जिल्हाधिकारीडॉ. स्नेहा गित्ते आयएएस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिन-२०२३ साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाची संकल्पना होती मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक: आमचे नेतृत्वआमचे कल्याण.

      आरोग्य सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      डॉ. गित्ते यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व प्रतिपादून मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे लक्ष देणे आणि मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या पूर्ततेकडे लक्ष देणे हा यामागचा उद्देश आहे असे सांगितले. त्यामुळे मुलींचे हक्क आणि जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या अनोख्या आव्हानांना ओळखण्याचा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे असेही त्या म्हणाल्या.

      पुढे बोलताना डॉ. गीते यांनी एक काळ असा होता की आपल्या समाजात मुलींमध्ये भेदभाव केला जात होता. विचार बदलून आणि समानतेचा कायदा लागू केल्याने परिस्थिती बदलली आहे. पण आजआव्हाने वेगळी आहेत – मुलींशी वेगवेगळ्या स्वरूपात भेदभाव केला  जातो आणि त्यावर आपल्याला मात करायची आहे. पालकांनी मुलींना पाठिंबा दिला पाहिजे आणि समाजात मुलींसाठी समानता आणि सन्मानाचे वातावरण निर्माण केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी आपल्या भाषणात सहभागींना पीसी- पीएनडीटी आणि बेटी बचाओ बेटी पढाव अंतर्गत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली ज्यामध्ये सब रजिस्ट्रारच्या कर्मचार्‍यांसाठी संवेदनाक्षम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मुलींना वाचवा संदेशासह आवाहन पत्र देण्यात आले होते यावेळी विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्सएज्युकेशनकॉम्प्युटर आणि मॅनेजमेंट पर्वरीकारे कॉलेज ऑफ लॉ आणि साळगावकर कॉलेज ऑफ लॉउच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी स्किट स्पर्धाआयटीआय विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय अनेक स्पर्धा घेण्यात आल्या.

      मानसशास्त्रज्ञव्यावसायिक प्रशिक्षक श्रीमती. केतकी परब यांनी मुख्य भाषण करताना आपण आपल्या मुलीला शैक्षणिकशारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आहे असे सांगितले. त्यानी स्त्रियांना भेदभाव दूर करण्याचा सल्ला दिला.

      उपसंचालक डॉ. रुपा नाईक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व नंतर प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहा गित्तेवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम नाईकनर्सिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीडीएचएसराज्य कुटुंब कल्याण ब्युरोचे कर्मचारी व इतर उपस्थित होते. .

      कु.श्रद्धा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला ज्यामध्ये श्रीमती मंजुश्री माटे आणि त्यांच्या टीम सदस्यांनी भरत नाट्यम नृत्य सादर केले.

Trending

Exit mobile version