गोवा खबर

शाळांमधून चालू असलेला इस्लामी प्रचार रोखा :जयेश थळी

Published

on

Spread the love
विशेष संवाद : सेक्युलर विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?
 

 

गोवा खबर:गोव्यात मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ‘इस्लामिक कार्यशाळे’चे आयोजन केले जात असल्याचे ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थे’ने स्वतसांगितले आहेया संघटनेचा टर्की देशातील ‘टुगवा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध आहेविद्यार्थ्यांमध्ये कट्टर इस्लामचा प्रचार करून ‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाप्रमाणे ‘द गोवा स्टोरी’ तयार केली जात आहेगोव्यात पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंत्राला अजूनही विद्यार्थी बळी पडण्याची शक्यता आहेगोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचा तपास करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवेगोव्यातील तथाकथित निधर्मीवादी केशव स्मृती विद्यालयाच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत आणि एखाद्या घटनेत अल्पसंख्यांक पीडित असतेतर त्यांनी देशभर आरडाओरड केली असती. ‘सेक्युलर’ विद्यालयांमधून हिंदूंना स्वत:च्या धर्माचे शिक्षण मिळत नाहीमात्र शाळांमधून ‘स्कूल जिहाद’ चालवला जात आहेतो रोखला पाहिजेअसे प्रतिपादन ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्रीजयेश थळी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयेजित केलेल्या ‘सेक्युलर विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?’ या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होतेहिंदु जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते श्रीनरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या वेळी विश्व हिंदु परिषदेचे दक्षिण गोवा सहमंत्री श्रीसंजू कोरगावकर म्हणाले कीगोव्यातील दाबोळीवास्को येथील केशव स्मृती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षण खातेविद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळविद्यार्थ्यांचे पालक यांना अंधारात ठेवून विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांना जवळच्या मशिदीत इस्लामिक कार्याशाळेसाठी पाठवले. ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ यांच्या सूचनेवरून विद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कृती केलीमशिदीत उपस्थित मौलवीने ‘अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे आणि हिंदूंचे देव नसून ते दगड आहेत’ असे सांगून विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद केला

याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेयानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने स्वत:ला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर केलाविद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास भाग पाडलेविद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहेगोव्यात वर्ष 2018 ते 2023 या कालावधीत हजार 753 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी आहेसरकार आणि प्रशासन यांनी केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमला पाहिजेनिलंबित प्राचार्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजेअशी मागणीही कोरगावकर यांनी केली

Trending

Exit mobile version