गोवा खबर: वसाहती काळापासून गोव्यात सामाजिक-राजकीय दृष्टिकोनात अनेक वर्षांपासून स्थलांतर हा एक आवर्ती विषय आहे. १९ व्या शतकात जेव्हा गोमंतकीय पूर्व आफ्रिकेकडे वळले, तेव्हा स्थलांतरित झालेल्या ह्या गोमंतकीयांसाठी संगीत हा एकत्र येण्याचा माध्यम होता असे चित्रपट निर्मात्या नलिनी एल्विनो डी’सुझा यांनी म्युसिअम ऑफ गोवा येथे झालेल्या ‘व्याख्यानात सांगितले..
‘गोवा, मोझांबिक आणि तंझानिया दरम्यानचा ट्रान्सओशनिक प्रवास’ या विषयावर डिसोझाने हे व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान म्युसिअम ऑफ गोवा येथे ‘मोग संडे’ अंतर्गत आयोजित करण्यात आले होते, ज्यात त्यांनी इतर स्थलांतरित गोमंतकियांचा अखंड संबंध संगीताच्या माध्यमातून मांडला. “संगीत ही गोमंतकीयांना सांस्कृतिक वारशाचे स्मरण करून देणारी शक्ती होती आणि गोमंतकीय वारसा तरुण पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा एक मार्ग होता” असे नलीनीने जोडले.
आफ्रिकेत अशा अनेक संघटना होत्या जे गोमंतकीयांना एकाच छताखाली एकत्र आणायचे, याचं एक उदाहरण म्हणजे ‘द क्लब’, जो आता दार ए सलाम ह्या नावाने ओळखला जातो, ही एक अशी जागा आहे जिथे स्थलांतरित गोमंतकीय एकत्र येतात, तर तंझानियामधील गोमंतकीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अँथनी अल्मेडा यांनी ह्या क्लबची रचना केली होती.
तंझानियाध्ये, डी’मेलो बंधू, रेमी आणि टोनी हे इतर अनेक कलाकार होते जे गोमंतकीय समाजाला एकत्र आणण्याच्या सामायिक आकांक्षेने प्रेरित होते.
त्यावेळी गोव्याची आर्थिक स्थिरता बाळकटली होती आणि जीवन सुधारण्यासाठी स्थलांतरित होणे हाच एक उपाय होता, मोझांबिक आणि अंगोलासारख्या आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहती तंझानिया आणि केनियासारख्या ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या आफ्रिकन प्रदेशांना त्यावेळी कामगारांची गरज होती स्थलांतरित झालेल्या लोकांची कौशल्ये ते देखील वैविध्यपूर्ण होते. तेथे बेकर, कसाई, मोती बनवणारे, संगीतकार, डॉक्टर आणि अभियंते होत. ज्यांच्या सेवा आवश्यक होत्या डी’सुझा यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले, तसेच संगीतातील त्यांचे ज्ञान हे आणखी एक कौशल्य होते ज्यामुळे त्यांना नोकरी शोधण्यात मदत मिळाली.
आपली संस्कृती एकत्र ठेवून गोमंतकीयांनी नवीन संस्कृती देखील शिकली आणि यात संगीताने एक मजबूत भूमिका बजावली. “भाषेने अंतर पार केले नसले तरी संगीताने नक्कीच केले आहे असे डिसोझाचे मानाने आहे, आफ्रिकेतील गोमंतकीय संघटनांप्रमाणेच या गोव्याच्या मुलांचे जातं करणे अविभाज्य आहे असे ती म्हणाली.