गोवा खबर:लोकसभेच्या २०२४ च्या सर्वसाधारण निवडणूकीच्या तयारीसाठी आल्तिन पणजीतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता गोवा राज्य कर भवनातील व्यवसाय कर आयुक्त कार्यालयाच्या बैठक खोलीत सर्व राष्ट्रीय तसेच राज्य मान्यताप्राप्त राजकिय पक्षांची बेठक आयोजित केली आहे.
बैठकीत ४ ते १३ ऑक्टोबरपासून उत्तर गोव्यातील आल्तिन येथील सरकारी जिमखाना येथे होणाऱ्या ईव्हाएम, वहीव्हीपीएटीच्या पहिल्या स्तरावरील तपासणीबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी राजकिय पक्षांना माहिती देतील. तर दक्षिण गोव्यात जुनी जिल्हाधिकारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नगरपालिका उध्यानासमोर माहिती देण्यात येईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पहिल्या स्तरावरील तपासणीबद्दलच्या बैठकित उपस्थित राहण्यासाठी राजकिय पक्षांना आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली आहे.