गोवा खबर

ग्रामीण मित्र उपक्रमाच्या यशस्वी सुरुवातीचा गोवा साक्षीदार

Published

on

Spread the love

सरकार तुमच्या दारी, विविध सेवा घरोघरी

 

 

 

 गोवा खबर: गोव्यात ग्रामीण मित्र उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली असून हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. राज्यभरात घरोघरी विविध सरकारी सेवा प्रदान करताना ग्रामीण भागात डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला आहे. नागरिक सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे संपर्क साधतात. ग्रामीण मित्र या सरकारी योजनेच्या  माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत आहे. गोवा सरकारने १४ ऑगस्ट २०२३ रोजी सीएससी – एसपीव्हीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.

 

गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मंत्री  श्री.रोहन अशोक खंवटे यांनी माहिती तंत्रज्ञान संचालक श्री.सुनील अन्चीपका  यांच्या उपस्थितीत ग्रामीण मित्र योजनेच्या यशाचा आढावा घेण्यासाठी राज्यभरातील लाभार्थींसह ग्रामीण मित्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या मदतीने आतापर्यंत ८ हून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या दारात शासकीय सेवा मिळाल्या आहेत. या लाभार्थींसह ग्रामीण मित्रांनी गोवा सरकार आणि माननीय मंत्री श्री. रोहन अशोक खंवटे यांचे  गोव्यातील या यशस्वी उपक्रमासाठी आभार मानले.

 

२७ राज्य सरकारी विभागांच्या १७९ सेवा सीएसी – ग्रामीण मित्र अंतर्गत समाविष्ट आहेत. नागरिकांना त्यांचा मिळवून देण्यासोबत विविध विभाग आणि अनेक व्यासपीठांवरून जी२सी  (सरकार ते नागरिक) सेवा मिळविण्याची गुंतागुंत कमी करण्यासोबतच या कार्यक्रमाचा उद्देश गोव्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. महिलांना स्वावलंबी करण्याचेही त्यामागे उद्दीष्ट आहे. पहिल्या टप्प्यात सर्व पंचायती आणि नगरपालिकांमध्ये ११६ पेक्षा जास्त पुरुष आणि ५५ महिला ग्रामीण मित्र म्हणून रुजू झाल्या आहेत.

*लाभार्थी आणि ग्रामीण मित्रांना संबोधित करताना माननीय मंत्री श्री. रोहन अशोक   खंवटे म्हणाले,* “आम्ही सुरू केलेला ग्रामीण मित्र म्हणजेच सरकार तुमच्या दारी आणि आता विविध सेवा घरोघरी देण्याची ही संकल्पना आहे.  विविध सेवा घरोघरी पोचवत लोकांपर्यंत सुशासन पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. शहरांपासून खेड्यापर्यंत सर्वत्र ग्रामीण मित्रांची उपस्थिती असेल. सामान्यपणे काम करणार्‍या पुरुषांव्यतिरिक्त, ग्रामीण मित्रांमध्ये महिला देखील  आहेत. ग्रामीण मित्र, शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल भेद कमी करण्यास मदत करेल. आमच्या सेवा प्रदात्यांच्या यादीमध्ये प्रत्येक ग्रामीण मित्राला ओळखले जाते आणि सूचित केले जाते. ही सेवा सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे आणि आम्ही ते देशातील सर्वोत्तम बनवू असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचा गोव्यातील लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आमचा माहिती तंत्रज्ञान विभाग सीएससी सोबत दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज आहे, असे त्यांनी नमूद केले.”

 

सेवांचा लाभ घेण्यासाठी, नागरिक हेल्पलाइन क्रमांक १४४७१ वर कॉल करू शकतात, जो संपूर्ण आठवडाभर सकाळी ८ वा. ते रात्री ८ वा. या वेळेत उपलब्ध आहे. कॉल सेंटर फोन करणाऱ्याला आवश्यक सेवेसाठी मदत करेल आणि जवळच्या सीएससी ग्रामीण मित्राशी संपर्क साधून त्यांना मदत करेल आणि वेळ ठरवेल. ग्रामीण मित्र नागरिकांना कॉल करेल आणि सेवेची आवश्यकता समजून घेईल आणि निर्दिष्ट सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी त्यांना सूचित करेल. ग्रामीण मित्र नंतर भेटीच्या वेळापत्रकानुसार नागरिकांच्या घरी भेट देईल आणि प्रक्रियेनुसार आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे गोळा करेल. अर्जदाराकडून कागदपत्रे गोळा केल्यानंतर, ती कागदपत्रे ई – जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करतील आणि संकेतस्थळावर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराकडून विहीत शुल्क गोळा करतील. ग्रामीण मित्रांकडून पुढील पायरी म्हणजे अर्जदाराच्या कागदपत्रांची हार्ड कॉपी संबंधित सरकारी विभागाकडे जमा करणे.

 

विभागाकडे कागदपत्रे जमा केल्यानंतर ती पडताळली जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक सेवा तयार होईल. त्यानंतर, ग्रामीण मित्र लाभार्थीची भेट घेऊन सेवा देईल.

 

ग्रामीण मित्र योजना गोव्यात सार्वजनिक सेवा वितरीत करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे, ज्यामुळे ग्रामीण समुदायांना तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचा फायदा घेता येईल.

Trending

Exit mobile version