गोवा खबर

३४ व्या दीक्षांत समारंभास राष्ट्रपतींकडून गोवा विध्यापिठाच्या उपक्रमांचा प्रशंसा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी दोना पावला येथील राजभवनात आयोजित केलेल्या गोवा विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात विध्यापिठाचे शैक्षणिक उपक्रम आणि नवकल्पनांची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.

     राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात गोवा विद्यापीठातील ५५ टक्के पदवीधर विद्यार्थी मुली आहेत आणि ते शिक्षणातील लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीचे लक्षण आहे असे सांगितले. महिला विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अधिक प्रकाश टाकत त्यांनी सुवर्ण पदके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के मुली होत्या ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. या कामगिरीतून तरुण महिलांचे सशक्तीकरण आणि गुणवत्ता दिसून येते आणि त्याना आत्मविश्वासाने आणि मोठ्या क्षमतेने पुढे जाण्यास बळ मिळते असे त्या म्हणाल्या.

गोवा विद्यापीठाच्या आधुनिक शिक्षण पद्धतींच्या कार्याची प्रशंसा करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत आंतरशिक्षणशाखा कार्यक्रमांच्या संस्थेच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकला. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कौशल्य विकास, उद्योग संलग्नता आणि रोजगारक्षमता यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी आजच्या जगात तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनाची भूमिका प्रतिपादली आणि  गोवा विद्यापीठाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी गोवा विद्यापीठाची प्रशंसा केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाची क्षमता विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

गोवा विद्यापीठाने  उच्च शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने डिजिटल इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर होलिस्टिक टीचिंग अँड व्हर्च्युअल ओरिएंटेशन्स’ हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम प्रभावी अध्यापन आणि शिक्षण पद्धतींसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विद्यापीठाची बांधिलकी दिसून येते. कॅम्पसमध्ये आंतरशिक्षण शाळांची स्थापना, विविध खात्यांमधील सहकार्य वाढविण्याबाबत सुरू केलेले उपक्रम  राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या बाबतीत महत्वाचे आहेत आणि अशा उपक्रमांतून शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पाबाबतीत  उत्कृष्ट केंद्र होण्याची संस्थेची क्षमता वाडते असेराष्ट्रपतीनी सांगितलें.

विद्यापीठाच्या कॅपमधील आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ‘उन्नत भारत अभियान ज्या उपक्रमाखाला  गोवा विद्यापीठाने शिंनाण्या आणि मशरूमची लागवड करणारी पाच गावे दत्तक घेतली आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संतुलनाची मूल्ये रुजविल्याबद्दल संस्थेची प्रशंसा केली.

या दीक्षांत समारंभाला राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे कौतुक केले आणि सर्व पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल बी.मेनन यांनी स्वागतपर भाषण केले.

एकूण ९२९० विद्यार्थ्यांना पदवी, १८५९ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, ११६ विद्यार्थ्यांना त्यांचे डिप्लोमा आणि ६१ संशोधन स्कॉलर्सना डॉक्टरेट पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे अमर्याद संधींनी भरलेल्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली.

Trending

Exit mobile version