गोवा खबर

अखिल गोवा आंतरशालेय तियात्र स्पर्धा २०२३-२४

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा तियात्र अकादमीने रवींद्र भवन मडगाव यांच्या सहकार्याने २८ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रवींद्र भवन मडगाव येथे दुपारी ३.३० वाजल्यापासून पहिली अखिल गोवा आंतरशालेय तियात्र स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन केले आहे.

 पाच तियात्र विविध शाळांद्वारे सादर केले जातील त्यात रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी २८ ऑगस्ट २०२३ रोजी तियात्र “उग्त्ते मळब” सादर करील, फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल, मडगाव २९ ऑगस्ट २०२३ रोजी तियात्र “माची” सादर करील, अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूल, कुडतरी ३० ऑगस्ट २०२३ रोजी “आयो रे आयो रे पावसा” सादर करतील, सेंट रॉक हायस्कूल, टोळेकान्टो, वेळ्ळी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी “पायचे पाप, दुवेची जाप” सादर करतील आणि अवर लेडी ऑफ द रोझरी हायस्कूल, दोना पावला १ सप्टेंबर, २०२३ रोजी तियात्र “मातयेचे भांगार” सादर करील.

Trending

Exit mobile version