गोवा खबर: म्हादेई व्याघ्र क्षेत्र बनवण्याच्या निर्णयाने राज्यात सगळीकडे चळवळ चालू आहे, हा निर्णय आता राज्यात एक वादग्रस्त विषय बनला आहे, अशा वादग्रस्त परिस्तिथीत गोव्यातील सुप्रसिद्ध कलाकार सोबोध केरकर यांनी रानटी अळिंबीचा वापर करून वाघाचं शिल्प बनविला आहे.म्युझिअम ऑफ गोवा येथे हा शिल्प आपल्याला साक्षीदार करता येणार.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ह्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. साखळीतील नवसो पवार ह्या परम मित्राने केरकरला कलाकृती करण्याकरिता ही अळिंबी दिली होती. अळिंबीचा पोत पाहून त्याला वाघाच्या त्वचेची आणि केसांची आठवण आली आणि हा शिल्प उभारण्यास हीच मोठी प्रेरणा होती असे केरकरने सांगितले.
म्युझिअममध्ये झालेल्या अनावरण कार्यक्रमात संवर्धनवादी हेता पंडित आणि इतिहासकार-कार्यकर्ता प्रजेला साखरदांडे उपस्थित होते. ही पूर्ण कलाकृती एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे.”वातावरणात किंवा त्यांच्या जीवनात जे काही घडतं ते कलाकाराला दर्शविता आलं पाहिजे मग ते जंगलाचे राजकारण असो की पक्षांतराचे या भ्रष्टाचाराचे, सर्व सामाजिक घटनांना कलेच्या कार्यात प्रतिबिंब केलेपाहिजे तरच त्या कलाकाराला खरा कलाकार मानता येत”, असे केरकर यांनी सांगितले.
सुबोधने आपल्या जंगली अळिंबी आणि म्हादेई प्रदेशातील वाघांच्या नाजूक जगाचा उत्तम मेळ साधला आहे, हे दोनही घटक आपल्या परिसंस्थेचा, आपली संस्कृती आणि आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत आणि दोन्ही आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे असे हेता पंडित यांनी जोडले. हेता पंडित ही एक मोठी लेखिका आहे आणि आता पर्यंत गोव्यातील वारसा बद्दल एकूण ११ पुस्तके लिहिली आहे.
इतिहासकार आणि कार्यकर्ता प्रजेला साखरदांडे यांनीही वाघ हा गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केला आहे,” ऐतिहासिक दृष्टीत पाहिलं तर गोव्यातील पौराणिक शिल्पकलेत वाघाचे चित्रण आहे आणि मी अनेक गावात वाघांची शिल्पे पहिली आहेत , गोव्यात वाघांना समर्पित अनेक गृह मंदिरे आहेत, तसेच कोणताही सामाजिक संदेश देण्यासाठी कलेचा लाभ घेणे हे एक सुंदर माध्यम आहे, “असे प्रजेला साखरदांडे म्हणाले.