गोवा खबर

नाविकांना सूचना

Published

on

Spread the love

 गोवा खबर: बंदर कप्तान खात्याने भारताच्या राष्ट्रपती २२ ते २४ ऑगस्ट या तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जुवारी आणि मांडवी नदीत वाहतूक कराँऱ्या बार्जे/बोटींनी (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सोडून) आपली जलवाहतूक खालील नमूद केलेल्या दिनांक आणि वेळेत थांबविण्याचा आदेश दिला आहे.

            राजभवन , दोनापावला   आणि करंजाळे भाग २२ ऑगस्ट रोजी सकाळीं १०.०० ते २४ ऑगस्ट दुपारी २.०० पर्यंत, २२ ऑगस्ट रोजी पाटो पणजी ते मिरामार दुपारी ३.०० ते संध्या ६.०० पर्यंत, २३ ऑगस्ट रोजी मिरामार ते रायबंदर पाटो दुपारी २.०० ते ६.०० पर्यंत आणि २४ ऑगस्ट रोजी मिरामार-बेती-नेरूल-सिकेरी-पणजी रायबंदर जुने गोवा सकाळीं ८.०० ते दुपारी २.०० पर्यंत.

            वरील आदेशाचे  उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

Trending

Exit mobile version