गोवा खबर

मेरी माटी मेरा देश ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येणार

Published

on

Spread the love


भारताने आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि पंचप्राणाच्या भावनेने अमृत कालाकडे कूच करण्यासाठी देश सज्ज आहे. एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्याची राष्ट्रव्यापी मोहीम तसेच माननीय पंतप्रधानांच्या पंचप्राणावर जनसामान्यांना संवेदनशील करून अमृतकाळासाठी तयार करण्याच्या उद्देशाने मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, वीरो का वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेमध्ये देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा समावेश असेल आणि ऑगस्टमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मेगा इव्हेंटमध्ये देशभरातील ७५,००० युवकांचा सहभाग असेल. मेरी माटी मेरा देश, मिठ्ठी को नमन वीरों का वंदन ही मोहिम भारत  माटीचा आणि शौर्याचा एकत्रित उत्सव, स्वातंत्र्य आणि देशाच्या प्रगतीच्या प्रवासाचे स्मरण करते. देशभरातील पंचायतींमधून माती गोळा करून आणि ती दिल्ली येथे कर्तव्य पाथ येथे आणून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात येईल तसेच अमृत वाटिका तयार करण्यासाठी माटी वापरण्यात येईल.

   

 ९ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पंचायत आणि महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट भागात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. पंचायत पातळीवर सिलाफलकम समर्पण यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातील. ज्यामध्ये सर्व शूर वीर ज्यांनी निःस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे आणि काहींनी सर्वोच्च बलिदान दिले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील कर्मचारी यांचा समावेश असेल. मातीची पणटी पेटवून किंवा हातांत माती घेवून शपथ घेणे, सेल्फी घेणे, पंचायत भागात वसूधा वंदन कार्यक्रम आयोजित करून दीर्घकाळ जगणाऱ्या देशी झाडांचे रोपे लावणे, वीरों का वंदन, कार्यक्रम आयोजित करून  संरक्षण जवान, सीएपीएफ, स्वातंत्र्यसेनानी, शूरवीरांच्या कुटुंबियांचा स्थानिक परंपरेनुसार  सत्कार,  ध्वजवंदन, राष्ट्रगीत असे कार्यक्रम पंचायतींमध्ये होतील. तसेच मिठ्ठी यात्राही आयोजित केल्या जातील आणि युवा स्वयंसेवक आणि इतर गावागावांतून माती गोळा करतील आणि पंचायतीमध्ये आणतील आणि पंचायतीच्या कार्यक्रमानंतर मिट्टी ब्लॉक स्तरावर आणतील आणि कलशात माती घालून दिल्लीत नेतील. युवा कार्य मंत्रालय नेहरू युवा केंद्र संघटनांच्या जिल्हा युवा अधिकाऱ्यांमार्फत ब्लॉक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करील आणि देशभरातील ब्लॉक्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ७५०० तरुणांना नवी दिल्लीत आणतील.
युवा कार्य मंत्रालयाच्या  नेहरू युवा केंद्र संघटनेच्यावतीने  ब्लॉक स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करतील.  देशभरातील  गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ७५०० तरूण नवी दिल्लीत जाणार.

30 ऑगस्ट दिसा दिल्लीतल्या कार्यक्रमात अमृत वाटिकेचे उक्तावण जातले. वाटीकेत थळाव्या जातींच्या झाडांचे रोपे लावप,  स्वातंत्र्य सैनिक, फुडारी आनी शुरवीरांक आर्गां ओपपात येतली. अज्ञात सैनिक आनी अज्ञात बलिदानींचो सन्मान करपाखातीर प्रधानमंत्र्यांच्या फुडारपणाखाला खास कार्यक्रम जातलो.

  २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत संकलित माती-कलश दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर नेण्यात येणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी, दिल्लीतील कार्यक्रमात अमृत वाटिकेचे उदघाटन होईल जेथे स्थानिक जातींची रोपे लावली जातील आणि ज्यांच्या योगदानामुळे आपले स्वातंत्र्य आणि प्रगती शक्य झाली आहे अशा अज्ञात वीरांना आदरांजली वाहण्यात येईल. अज्ञात सैनिक आणि अज्ञात बलिदानींचा सन्मान करण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समारंभ आयोजित केला जाईल.

Trending

Exit mobile version