गोवा खबर

पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) विजयी; जी. एस. पदी ईशा गोडकर  

Published

on

Spread the love

गोवा खबर:पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) विजयी झाली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला आणि अभावीप च्या उमेदवारांनी सर्व पदांवर उल्लेखनीय विजय मिळवला.

सरचिटणीस (जी. एस): कु. ईशा गोडकर
सांस्कृतिक सचिव (सी. एस): कु. नेहा मावळणकर
क्रीडा सचिव (एस. एस): विवेक नाईक

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अवधूत कोटकरने कु. ईशा गोडकर, कु. नेहा मावळणकर आणि श्री. विवेक नाईक यांचे त्यांच्या शानदार विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. अभाविप गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या “आम्हाला विश्वास आहे या नवीन सक्षम नेतृत्वाखाली, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सकारात्मक बदल घडतील ज्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुधारणा होईल.”


उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक म्हणाले “संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे कल्याण वाढवण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांची भरभराट होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी स्थिर आहे.”

पेडणे शहर मंत्री शूभम मळीक म्हणाले “निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानतो.” यावेळेस अभाविप उत्तर गोव्यातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Trending

Exit mobile version