गोवा खबर

पत्रकारांसाठी या वर्षापर्यंत पणजी शहरात पत्रकार कक्ष :मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वर्षभरात सर्व सुविधांसह पणजी शहराच्या मध्यभागी पत्रकारांसाठी “पत्रकारकक्ष” मिळणार असे आश्वासन दिले. गोवा पत्रकार संघाच्या ४६ व्या  स्थापना दिन आणि पत्रकारिता पुरस्कार (२०२१,२०२२)  वितरीत कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सर्व क्षेत्रातील गुज पत्रकारिता पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून डॉ. सावंत यांनी पत्रकारांसाठी ई-बाईकसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे आणि आम्ही त्यावर काम करीत आहोत तसेच पुढील वर्षी पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. बातमीच्या विश्वासार्हतेबद्दल आपले मत मांडत डॉ. सावंत यांनी पत्रकारांनी आधी घटनेची सत्यता तपासावी आणि मगच ती प्रसिद्ध करावी असे ते पुढे म्हणाले.

.सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमाव यांनी ४६ व्या गुज स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांचे अभिनंदन केले. पत्रकाराला प्रेरित ठेवण्यासाठी असे पुरस्कार महत्वाचे आहे. फेक न्यूजबद्दल चिंता व्यक्त करून श्री आलेमाव यांनी पत्रकारांनी अशा फेक न्यूज एजन्सीविषयी  दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली.

सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माहिती संचालक श्री दिपक बांदेकर यांनी देशातील प्रत्येक घटकासाठी प्रसारमाध्यम हे सर्वात मोठे माध्यम असल्याचे सांगितले .श्री बांदेकर यांनी गुजप्रमाणे माहिती व प्रसिध्दी खात्यानेही पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा राज्य पत्रकार पुरस्कार योजना स्थापन केली आहे असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अर्थ संकल्पात आश्वासन दिल्यानुसार निवृत्ती वेतन दरमहा १०,००० रुपये वाढविण्यात आल्याचे सांगितले आणि ते जून महिन्यापासून वितरित केले आहे. श्री बांदेकर यांनी सर्व पत्रकार बांधवांना सरकार आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करण्याची विनंती केली.

            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार (ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांच्या सन्मानार्थ), श्री रामनाथ देसाई आणि दयानंद राणे यांचा ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 द टाइम्स ऑफ इंडियाच्या श्रीमती गौरी मळकर्णेकर यांना (फेलिसिओ कार्दोझो यांच्या सन्मानार्थ) पर्यावरण पत्रकारितेतील पुरस्कार, पर्यावरण छायापत्रकारितेचा पुरस्कार (श्री सिरील डिकुन्हा यांच्या सन्मानार्थ) श्री राकेश मुंडे आणि श्री सगुण गावडे यांना देण्यात आला आहे.

        द टाइम्स ऑफ इंडियाचे श्री न्यूटन सिक्वेरा यांना लॅंबर्ट मास्कारेन्हास सन्मानार्थ शोध पत्रकारितेतील पुरस्कार देण्यात आला.

हेराल्डचे श्री सगुण गावडे छायाचित्रासाठी अनुक्रमे २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी छायाचित्र पत्रकारितेतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण पत्रकारितेतील सुरेश वाळवे यांच्या सन्मानार्थ गोवन वार्ताचे श्री अजय लाड आणि श्री निर्गोश गावडे यांना २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी पुरस्कार देण्यात आला.

द नवहिंद टाईम्सचे श्री रामनाथ पै रायकर यांना कला आणि संस्कृती पत्रकारितेतील उत्कृष्टतेचा पुरस्कार देण्यात आला.

२०२१ सालासाठी क्राइम जर्नालिझममधील (औदुंबर शिंदे यांच्या सन्मानार्थ) द टाइम्स ऑफ इंडियाच्या गौरी मळकर्णेकर यांना आणि द गोवनच्या श्रीमती विभा वर्मा यांना पुरस्कार देण्यात आले.

हेराल्डचे श्री मनोज शिरोडकर आणि श्री सुनील डिचोलकर यांना लेआउट आणि पेज डिझाइनमधील पुरस्कार देण्यात आला.

क्रीडा पत्रकारितेतील, द टाइम्स ऑफ इंडियाचे श्री मार्कुस मेरगुल्हाव यांना पुरस्कार देण्यात आला.

प्रुडंटचे श्री लौकिक शिलकर आणि  गोमंतक टीव्ही श्री उपेंद्र नाईक यांना ‘टीव्ही, डिजीटल पत्रकारितेतील पुरस्कार देण्यात आला.

व्हिडिओ पत्रकारितेतील गोमंतक टीव्हीचे श्री उपेंद्र नाईक यांना २०२२ सालासाठी सर्व जीवनविषयक बाबींचा पुरस्कार देण्यात आला.

गुजचे अध्यक्ष श्री राजतिलक नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री वासुदेव पागी यांनी आभार मानले.

श्रीमती प्रज्ञा राणे व श्री सचिन सुर्लीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Trending

Exit mobile version