गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी राजभवन येथील वनमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि राजभवनाच्या प्रांगणात आंब्याचे रोप लावले.
राजभवन आणि वन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याच्या प्रथम महिला श्रीमती. के. रीटा पिल्लई यांनी उपस्थित राहून रोप लावले.
यावेळी मुख्य सचिव श्री पुनीतकुमार गोयल, आयएएस, राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस, प्रधान मुख्य वनपाल श्री राजीव कुमार गुप्ता, आयएफएस, वनपाल श्रीमती. यशोधा के, आयएफएस, अतिरिक्त प्रधान, मुख्य वनपाल श्री उमाकांत, आयएफएस, मुख्य वनपाल श्री प्रवीणकुमार राघव, आयएफएस, मुख्य वनपाल श्री सौरभ कुमार, आयएफएस , राज्यपालांचे अतिरिक्त सचिव श्री संजीव गांवस देसाई आणि इतर अधिकाऱ्यांनी वनमहोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन फळझाडे लावली.
वनीकरण आणि पर्यावरण जागरूकता वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी राज्यपाल आणि गोव्याच्या प्रथम महिला यांच्या हस्ते लोकांना मोफत रोपट्यांचे वितरण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही लोकांची जबाबदारी असल्याचे राज्यपाल म्हणाले.