गोवा खबर

 काब्राल यांनी जनता दरबारात लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या

Published

on

Spread the love

गोवा खबर:सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री निलेश काब्राल यांनी आज म्हापसा येथे उत्तर गोवा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम म्हणून आयोजित केलेल्या पहिल्या जनता दरबारला हजेरी लावली. श्री काब्राल यांनी जनता दरबारात लोकांच्या विविध तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना श्री निलेश काब्राल यांनी नवीन सरकारी संकुल बांधण्याची गरज आहे ज्यामुळे सर्व सरकारी कार्यालये एकाच छताखाली येतील. जोशुआ डिसौझा यांच्यासमवेत मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेचे उपसभापती श्री जोशुआ डिसौझा यांनी या दरबारात बोलताना सामान्य लोकांच्या कोणत्याही सरकारी खात्यातील तक्रारी, गैरसोयीबद्दल संवाद साधण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे असे सांगितले. श्री डिसौझा यांनी लोकांना सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे असे सांगितले. याठिकाणी सर्व सरकारी अधिकारी उपस्थित असून संधीचा सदुपयोग करून त्याचा उत्तम उपयोग करूया असे त्यांनी सांगितले.

साळगांवचे आमदार श्री. केदार नाईक; कळंगुटचे आमदार श्री. मायकल लोबो; शिवोलीच्या आमदार, श्रीमती. डेलिलाह लोबो; हळदोणाचे आमदार, अॅड. कार्लोस आल्वारिस फरेरा; म्हापसाच्या नगराध्यक्षा श्रीमती. प्रिया मिशाळ; उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मामू हागे, आयएएस; पर्यावरण संचालक, श्रीमती. स्नेहा गित्ते, आयएएस; एसपी उत्तर गोवा, श्री. निधीन वालसन, आयपीएस; उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी-२, म्हापसा, श्रीमती यशस्विनी बी; उपजिल्हाधिकारी २  श्री. पुंडलिक खोर्जुवेकर आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version