गोवा खबर

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची सोशल मीडिया टीम सक्रिय

Published

on

Spread the love
 गोवा खबर: लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आपल्या सोशल मीडिया टीमची बैठक घेतली आणि पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती तयार केली. 
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे मीडिया विकास विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्या  आणि सोशल मीडियाचे अध्यक्ष दिव्यकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा पार पडली.
उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष जोएल आंद्राद,  सेवादल अध्यक्ष जयदेव प्रभुगावकर, रोहन नाईक, अजमल सय्यद, ग्लॅन लॅसेंड्रा, आरमांडो फॅरेरा, सोहन शणैय, शमिला सिद्दीकी, बिविध गटांचे अध्यक्ष व त्यांचे समन्वयक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे, ज्याचा उपयोग राज्य आणि देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी वापरता येते.
 “आता बहुतेक लोक सोशल मीडिया वापरत आहेत. कोठूनही कोणाशीही जोडले जाण्याचे हे एक चांगले माध्यम बनले आहे. म्हणूनच, राष्ट्र उभारणीच्या आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्याचा आधार  घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
“भाजपने जनतेचा आवाज दाबून आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यास प्रवृत्त करून आपल्या लोकशाहीची हत्या केली आहे. असे प्रकार  थांबले पाहिजे आणि अशा नेत्यांnaaनिवडणुकीत पराभूत करून त्यांना घराची वाट दाखवचा धडा फक्त जनताच शिकवू शकते, ” असे पणजीकर म्हणाले.
ते म्हणाले की, भ्रष्ट जनता पक्ष जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.
“आम्ही इथे सत्तेतील पक्षाप्रमाणे  नकारात्मकता पसरवण्यासाठी आलो नाही, पण ज्या भागात असंवेदनशील भाजप सरकारंद्वारे द्वेष पसरवला जातो त्या भागात प्रेमाचा संदेश पोहोचवण्याची गरज आहे.” असे पणजीकर म्हणाले.
भाजप देशाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती असे ते म्हणाले.
“आम्ही सोशल मीडियाचा वापर करून देशासाठी असलेले आमचे योगदान लोकांना दाखवले पाहिजे. आमचे सोशल मिडीयापोस्ट वस्तुस्थितीवर आणि सत्यावर आधारित असावेत. भगवा पक्षाची आयटी टीम जशी काम करत आहे तसे आपण विनाकारण कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी वापरू नये,” असे  त्यांनी म्हटले.
 दिव्याकुमार यांनीही यावेळी भाषण केले आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत सदस्यांना मार्गदर्शन केले. “कार्यशाळेचा उद्देश आमच्या पक्षाला डिजिटल कौशल्याने सक्षम करणे, आमच्या संदेशाला प्रभावीपणे संलग्न करणे, जोडणे आणि विस्तारित करणे हा आहे,” असे ते म्हणाले.
दिव्यकुमार यांनी स्वागत केले, तर सोहन शणैय यांनी आभार प्रकट केले.

Trending

Exit mobile version