गोवा खबर

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची स्थिती आणि चौकशीबाबत माहिती द्या: काँग्रेस

Published

on

Spread the love
गोवा खबर : कला अकादमी नूतनीकरण घोटाळ्याच्या चौकशीची सद्यस्थिती जाणून घेण्याची आणि ही वास्तू पुन्हा कधी सुरू होणार याचीही माहिती देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर म्हणाले की, कला अकादमीच्या नूतनीकरणाला जवळपास दोन वर्षे उलटून गेली आहेत आणि अद्याप पुन्हा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. “कला अकादमी ही गोवा आणि इतर राज्यांतील कलाकारांसाठी सर्वात मोठी संस्था आहे. पण या कलाकारांना ही वास्तू उपयोगी आणण्यासाठी तयार झालेली नाही,‘ असे ते म्हणाले.
कला अकादमीच्या सुरू असलेल्या कामामुळे अनेक कार्यक्रम गोव्यातील इतर ठिकाणी करण्यात येत आहेत असे पणजीकर म्हणाले.
कला अकादमीचे उदाहरण घेतले तर भाजप सरकार कला आणि संस्कृतीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी केला.
शहाजहानने ताजमहाल बांधण्यासाठी कधीही कोटेशन मागवले नव्हते- जो पूर्वी होता तसाच गेल्या 390 वर्षांपासून अबाधित आहे, या कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या विधानाची आठवण करून देताना, पणजीकर यांनी या कथित घोटाळ्याची चौकशी पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
गोविंद गावडे यांनी निविदा न काढता नुतनीकरणाच्या कामासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय योग्य ठरवला असला तरी आता या ४९ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करणे भाजप सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी कला अकादमीच्या नुतनीकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
“कला अकादमीच्या नूतनीकरणातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकारने तीन सदस्यांची समिती नेमली होती, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या घोटाळ्यात गुंतलेल्यांना वाचवण्यासाठी सरकार डावपेच वापरत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, हा प्रकल्प करदात्यांच्या पैशांवर केला जात असल्याने तपासाची माहिती जनतेला देणे सरकार बांधील आहे.
‘आम्हाला या घोटाळ्याचा तपास करून त्यात सहभागी असलेल्यांची नावे जाणून घ्यायची आहेत,’’ असे पणजीकर म्हणाले.

Trending

Exit mobile version