गोवा खबर

तरुणांसाठी आयोग स्थापन करणार :गोविंद गावडे

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार खाते युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच युवकांसाठी एक आयोग किंवा मंडळ स्थापन करील अशी घोषणा क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री श्री गोविंद गावडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवादादरम्यान केली. आत्मनिर्भर भारत, स्वयंपुर्ण गोवा २.० च्या प्रमुख कार्यक्रमाचा एक भाग म्हणून क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनावर यावेळी भर देण्यात आला.

निरोगी आणि तंदुरुस्त समाज राखण्यासाठी खेळांचे महत्त्व ओळखून, सरकार सर्व स्तरांवर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू करीत आहे. मंत्री श्री गावडे यांनी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगून यशस्वी खेळाडू होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सरावाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांसाठी क्रीडा गुण प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी सहकार्य मागितले.

संवाद सत्रादरम्यान क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक श्री रोहित कदम यांनी क्रीडा आणि युवा व्यवहार खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि गोवा फुटबॉल विकास मंडळ यांच्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय ११ योजना आणि ५ पुरस्कार योजना  देते, तर गोवा क्रीडा प्राधिकरण ५ योजना लागू करते. क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने अलीकडेच फेब्रुवारीमध्ये नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेत क्रीडा व्यक्तींची प्रतिनियुक्ती सादर केली. या योजनेचा उद्देश २१ ते ३५ वयोगटातील क्रीडाप्रेमींना व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे असा आहे.

या योजनांचा प्रभाव आणि परिणामकारकता प्रतिपादण्यासाठी, थेट संवाद सत्रादरम्यान लाभार्थींना त्यांचे अनुभव शेअर करणारे व्हिडिओ दाखविण्यात आले. क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे उपसंचालिका श्रीमती. जेनिफर फेर्राव ई गोन्साल्विस, तसेच सरपंच, उपसरपंच, स्वयंपूर्ण मित्र आणि इतर व्यक्ती व्हिडिओ कॉलद्वारे या संवादात सामील झाल्या.

Trending

Exit mobile version