गोवा खबर

पर्यटन विस्तारासाठी गोवा सरकार कटिबद्ध!जी 20 बैठकीत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे निवेदन 

Published

on

Spread the love
गोवा खबर:इको, अध्यात्म, योग व आयुर्वेद पर्यटनासह गोव्यातील आंतरग्राम पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहीती गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन अशोक खंवटे यांनी आज दिली.
गोव्यात आजपासून सुरुवात झालेल्या जी 20 समूहाच्या बैठकीत उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना बोलत होते.
राज्यांतर्गत पर्यटन सेवांचा विस्तार करताना देखो अपना देश संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. देशाची महत्त्वपूर्ण शहरे रेल्वे, हवाई सेवेद्वारे जोडताना नव्या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. गोवा डेहराडून थेट विमान सेवेद्वारे उत्तरकाशी दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या गोव्याशी जोडली गेल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
गोव्याचा सांस्कृतिक वारसा व आंतरग्राम पर्यटनाचे ब्रँडिंगही करणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. येथील वेगवेगळ्या उत्सवांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेऊन पर्यटन विस्तार करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे ते पुढे म्हणाले.

Trending

Exit mobile version