गोवा खबर

२१ जून  रोजी मुख्यमंत्र्यांहस्ते कोंकणी  अकादमीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकारने स्थापन केलेल्या गोवा कोंकणी अकादमीची कचेरी आणि मोसिंन्योर दाल्गाद ग्रंथालय स्तलांतरित होत असून नूतन वास्तूचा उद्धाटन सोहळा बुधवार २१ जून २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

१९८६ साली स्थापन झालेली गोवा कोंकणी अकादमी गेल्या १९ वर्षांपासून पाटो पणजी येथील एका जीर्ण सरकारी वास्तूत कार्यरत होती. ही वास्तू धोकादायक बनल्याने अकादमीचे स्थलांतर होणे आवश्यक होते. गोवा सरकारनेही अडचण समजून घेउन पाटो प्लाझा येथील गोवा संचार भवन बी.एस.एन.एल. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अकादमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  कोंकणी साहित्यिक श्री. दामोदर मावजो यांचा सत्कार तसेच माधव बोरकार यांनी लिहिलेल्या स्वर्गीय डॉ. मनोहरराय सरदेसाय यांच्यावरील जीवन   चरित्र पुस्तिकेचें लोकार्पण होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी म्हणून  सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक श्री महाबळेश्वर सैल तसेच विशेष अतिथी  म्हणून राजभाषा सचिव श्री सरप्रित सिंग गिल आणि राजभाषा संचालक राजू गांवस हजर असतील.

या उदघाटन सोहळ्यास सर्व हितचिंतकानी आवर्जून हजर राहावे अशी विनंती गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री अरुण साखरदांडे आणि सचिव मेघना शेटगांवकर यांनी केली आहे.

Trending

Exit mobile version