गोवा खबर

मडगांव येथे गोवा क्रांती दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी राज्याने १८ जून रोजी लोहिया मैदान मडगांव येथे गोवा क्रांती दिन साजरा केला. याप्रसंगी केंद्रीय कौशल्य विकास आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री श्री. राजीव चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्र्यांसह ७७ व्या गोवा क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

      १८ जून हा पोर्तुगीज राजवटीविरुद्ध अहिंसक निदर्शनाची हाक देणारे स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली १९४६ मध्ये झालेल्या ऐतिहासिक निषेधाची जयंती आहे. यावेळी बोलताना कौशल्य विकास राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी १८ जूनला गोव्यातील लोकांसाठी विशेष अर्थ आहे. या दिवशी दडपल्या गेलेल्या देशभक्तीच्या भावनांचा जनक्रांती होऊन गोव्याची ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतून मुक्तता झाली. आधुनिक विकसित गोवा आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सबका साथसबका विकाससबका विश्वास आणि सबका प्रयास यांसाठी आपण स्वतः समर्पित होऊया असे ते पुढे म्हणाले.

      यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “आजचा दिवस ऐतिहासिक आहे कारण आपण ७७ वा गोवा क्रांती दिन साजरा करीत आहोत असे त्यानी सांगितले. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा २.० स्किलिंगरिस्किलिंग आणि अपस्किलिंग हे आमच्या सरकारने घेतलेले उपक्रम आहेत. गोव्यात यावर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या दिवशी मी हे घोषित करण्याची संधी घेतो की आमच्या सरकारने तंत्रज्ञानविकाससंशोधनस्टार्टअप्सकोडिंगरोबोटिक्स आणि इतर विविध क्षेत्रात नवनवीन शोध लावले आहेत ही एक मोठी उपलब्धी आहे  असे ते पुढे म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री नीलेश काब्रालवाहतूक मंत्री श्री. माविन गोदिन्होमडगावचे आमदार श्री दिगंबर कामतनावेलीचे आमदार श्री उल्हास तुयेंकरखासदार श्री विनय तेंडुलकर आणि स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते.

      या ऐतिहासिक दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया यांचे नातू श्री रमेशचंद्र लोहिया यांचा सत्कार करण्यात आला ते त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या वीरांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. लोहिया यांच्यावरील माहितीपट प्रेक्षकांसमोर दाखविण्यात आला. डॉ. लोहिया यांनी १९३० साली लिहिलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही आज येथे प्रकाशित करण्यात आली. गोवा क्रांती दिन हा राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक म्हणून साजरा केला जातो. या हाकेने अनेक गोमंतकीयांना प्रेरणा दिली ज्याचा परिणाम शेवटी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्याला मुक्ती मिळवून देण्यात झाला.

Trending

Exit mobile version