गोवा खबर

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतला आगामी जी-20 पर्यटन बैठकीच्या तयारीचा आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी चौथी जी-20 पर्यटन कार्यगट बैठक आणि पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या तयारीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या महत्त्वाच्या बैठकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत श्रीपाद नाईक यांनी समाधान व्यक्त केले. भारत पर्यटन विभागाचे संचालक वेंकटेशन दत्तात्रेय आणि गोवा सरकारचे जी- 20 नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

पर्यटन कार्य गटाची बैठक आणि पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीच्या रूपाने गोव्याची समृद्ध परंपरा आणि संस्कृती जगाला दाखविण्याची उत्तम संधी मिळत आहे. बैठकीसाठी येणारे मंत्री आणि प्रतिनिधी हे एक प्रकारे ब्रँड अँबॅसेडरच असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. 13 देशांचे पर्यटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांना गोव्याची संस्कृती आणि आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. जी-20 प्रतिनिधींसाठी जुने गोवा चर्च आणि मंगेशी मंदिराच्या सहलीची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटन मंत्रालयाच्यावतीने  गोव्यात 19 ते 22 जून 2023 दरम्यान चौथी जी- 20 पर्यटन कार्यगटाच्या  मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांच्या अनुषंगाने, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 21 जून रोजी दरबार हॉल, राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व जी-20 मंत्री आणि प्रतिनिधी योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होतील.

Trending

Exit mobile version