गोवा खबर

अन्न आणि औषध प्रशासनातर्फे जागतिक अन्न सुरक्षा दिवस

Published

on

Spread the love

गोवा खबर:दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ७ जून २०२३ रोजी नवी दिल्ली येथे जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक पुरस्कार घोषित करण्यात आले आणि सलग ५ व्या वर्षी लहान राज्यांच्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून गोवा राज्याला पुरस्कार देण्यात आला..

१६ जून २०२३ रोजी पणजीतील हॉटेल फिदाल्गो येथे राज्य विशिष्ट कार्यक्रम होणार आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. राल्फ डिसौझा आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उफस्थित राहतील.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभाने होईल. वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाची विल्हेवाट लावण्याचे सत्र होईल. सरकारी अधिकारी आणि ग्राहक मंचांसाठी आरोग्य आणि पोषण या विषयावर कार्यशाळा होईल. दुपारच्या सत्रात काजू उद्योग फूड बिझनेस ऑपरेटरांचा मेळावा आणि नंतर भरड धान्यापासून (मिलेट्स)  पदार्थ तयार करण्याची स्पर्धा होईल. दुपारच्या जेवणानंतर काजू उद्योगासाठी फूड बिझनेस ऑपरेटर मेळावा होईल आणि बाजरी आधारित पाककला स्पर्धा होईल.

Trending

Exit mobile version