गोवा खबर

ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने समर नॅशनल ब्रिज टूर्नामेंट

Published

on

Spread the love
गोवा खबर:ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने  गोवा येथे 20 जून 2023 ते 28 जून 2023 पर्यंत समर नॅशनल ब्रिज टूर्नामेंट आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गोवा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष आनंद गोळवलकर आणि उद्योजक प्रसाद केणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळेस प्रसाद केणी, स्वेन सल्ढाणा, डिऑन मेनेजेस  आणि मीरा मेनेजेस उपस्थित होते
 यास्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून अंदाजे 300  खेळाडू सहभाग घेणार असल्याचे गोळवलकर यांनी सांगितले
या खेळासाठी पत्त्यांचा वापर होत असला तरी जुगाराचा खेळ नाही असे प्रसाद केणींनी स्पष्ट केले.  याच्यात बुद्धीकौशल्याचा आणि मानसिक डावपेच याचा कस लागतो.
ही स्पर्धा टेनिस द गास्पर डायस क्लब व पणजी जिमखाना येथे होणार आहे.  सर्व वयोगटातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून गोव्यातील युवकांनीही हा खेळ समजून घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version