गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते अमृत सरोवरचे प्रकाशन

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलस्त्रोतमंत्री श्री सुभाष शिरोडकर आणि मुख्य सचिव डॉ पुनितकुमार गोंयल, आयएएस, जलस्त्रोत खात्याचे सचिव श्री सुभाष चंद्र, आयएएस आणि मुख्य अभियंता श्री प्रमोद बदामी यांच्या उपस्थित अमृत सरोवर वरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले.  

जलस्त्रोत खात्याने राज्यातील १६४ अमृत सरोवरावर केलेल्या कामांचे हे संकलन आहे.

अमृत सरोवर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२२ रोजी देशात ५०००० अमृत सरोवर विकसित करण्यासाठी सुरू केलेले राष्ट्रीय अभियान आहे.

यात आझादी का अमृत महोत्सवही प्रदर्शित करण्यात आला, जिथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिक, हुतात्म्यांच्या  नातेवाईकांच्या  हस्ते ३५ तलावांवर ध्वजारोहण करण्यात आले. राज्याने विकास आणि पुनरुज्जीवनासाठी १६५  तलावांची निवड केली होती, त्यापैकी १६४ पूर्ण झाले आहेत.

 या कामगिरीबद्दल डॉ.सावंत यांनी जलस्त्रोत खात्याचे अभिनंदन केले. शिरोडकर यांनी आज वेळ्ळी येथील सापू तलावालाही अचानक भेट दिली.

Trending

Exit mobile version