गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या प्रकरणांत अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याखाली न्याय अधिकारी म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कमी दर्जाची उत्पादने तयार करून विक्री केल्याबद्दल संबंधित आस्थापनांना दंड ठोठावला आहे.
कमी दर्जाचे फॉर्च्युन प्लस रिफायईन्ड सोयाबीन तेलाचे उत्पादन तयार करून विक्री केल्याबद्दल अदानी विल्मर ली., मालेगांव-नागपूर, महाराष्ट्र या उध्योगांविरूध्द कारवाई करून एक लाख रूपये दंड ठोठावला आहे.
आणखीन एका प्रकरणात कमी दर्जाची पापडी, खारेगाठी, भावनगरी शेंव तयार करून विक्री केल्याबद्दल मे. राजपुरोहित स्विट मार्ट, शॉप नं.२, पांडव अपार्टमेंट, आके-सासष्टी यांच्याविरूध्द कारवाई करून ५००० रूपये दंड ठोठावला.
तसेच आणखी एका प्रकरणात कमी दर्जाची ‘गाठी’ तयार करून विक्री केल्याबद्दल सन्मान स्विट मार्ट, शॉप नं. ४४, अपना बाजार, वास्को यांच्याविरूध्द कारवाई करून ३०,००० रूपये दंड ठोठावला .