गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ३० मे १९८७ रोजी गोव्याचे केंद्रशासित प्रदेशातून भारतीय संघराज्यात रूपांतर झाले. गोव्याच्या गौरवशाली इतिहासातील ‘घटक राज्यदिन’ हा एक संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी १९८७ मध्ये गोवा भारतीय संघराज्याचे २५ वे राज्य बनले. ३० मे हा दिवस गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी गोवा आणि देशाच्या इतर भागातील लोकांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि म्हणूनच याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी, आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांना स्मृतीस आदरांजली अर्पण करूया त्यांच्या उत्कृष्टतेचा, नाविन्यपूर्णतेचा आणि करुणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया.

गोव्याने गेल्या दशकांमध्ये विशेषत: शिक्षण, आरोग्य सेवा, विकास, पायाभूत सुविधा इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गोवा ही शांतताप्रिय भूमी आहे आणि ही समृद्ध परंपरा कायम ठेवण्याचे श्रेय लोकांना जाते. गोव्यात अनेक आकर्षणे आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने राज्याला निरोगी लोकशाही परंपरांचा वारसा लाभला आहे. जगातील विविध भागातून लोक येथे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक गुण पाहण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी येतात. आपण हे सर्व मूळ गुण जपले पाहिजेत आणि आपल्या पर्यटकांचा मुक्काम आनंददायी, आणि संस्मरणीय बनविला पाहिजे. राज्यात नैतिकतेच्या धर्तीवर पर्यटनाची प्रगती होईल याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. गोव्याने जागतिक दर्जाचा विमानतळ “मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ” हा मोठा पायाभूत सुविधांचा विकास साधला आहे, जो सौर ऊर्जा प्रकल्प, पावसाचे पाण्याचा जतन करण्याचा प्रकल्प. आणि अत्याधुनिक सुविधांसह टिकाऊ पायाभूत सुविधांच्या संकल्पनेवर बांधला  आहे. सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, ३-डी मोनोलिथिक प्रीकास्ट इमारती, स्थिर रस्ते, रोबोमॅटिक पोकळ प्रीकास्ट भिंती आणि ५-जी सुसंगत आयटी पायाभूत सुविधा यासारखे प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. आणखी एक मोठी उपलब्धी म्हणजे जुवारी नदीवरील ८ लेनचा नवीन केबल स्टेड पूल. या पूलामुळे काणकोण ते पणजी आणि परत असे अंतर कमी वेळेत पूर्ण करण्यास मदत झाली आहे.

आपण सर्वांना माहीत आहे की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्याचे सामाजिक आर्थिक निर्देशक अतिशय प्रभावी आहेत. देशात गोव्याचे दरडोई उत्पन्न सर्वात जास्त आहे, जे एक जोमदार आणि निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. भारतात फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक आयोजित करणाऱ्या तीन ठिकाणांपैकी गोवा हा एक होता. जी-२० शिखर परिषदेच्या काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी गोव्याचीही निवड करण्यात आली आहे ज्यामुळे आम्हाला आमच्या राज्याची समृद्ध संस्कृती आणि आदरातिथ्य चित्रित करण्याची संधी मिळेल. देशातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असलेल्या राज्यातील या कार्यक्रमामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोव्याच्या उत्पादनांचे ब्रँडिंग प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.

राज्यातील आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा चळवळीचे देशातील नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी कौतुक केले आहे. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचा देशातील इतर राज्यांनी सर्वोत्तम सराव म्हणून अभ्यास केला आहे. रोजगार निर्मितीसाठी एमएसएमई अंतर्गत गोव्यात भारतातील पहिले सागरी क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तुयें इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर स्थानिक रोजगाराला चालना देत आहे.  सरकारने धारगळ, पेडणे येथे अत्याधुनिक आयुष रुग्णालय उपलब्ध करून राज्यात आयुर्वेदाला चालना दिली आहे. त्या दिवसापासून मी येथे नमूद करू इच्छितो की मी १५ जलै २०२१ रोजी गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यादिवसापासून मी लोकांपर्यंत पोहोचायचे ठरवले होते, गरीब, भुकेले आणि गरजू लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. “राजभवन हे लोकभवन आहे” हे सिद्ध करण्यासाठी मी निवारा आणि वृद्धाश्रम संस्थांमधील मुले आणि वृद्धांना वैयक्तिकरित्या त्यांच्या हातात आर्थिक मदत सुपूर्द करण्यासाठी भेट दिली. मी मुलांना आणि वडिलधाऱ्यांना राजभवनात आमंत्रित केले आणि त्यानंतर जागतिक एड्स दिनानिमित्त ४० एचआयव्ही बाधित मुलांनी राजभवनाला भेट दिली, या सर्व कृतींमधून राजभवन सामान्य माणसाच्या सहज संपर्कात असल्याचा संदेश गेला.

राज्यपाल पुढे म्हणतात, “गोवा ग्राम संपूर्ण यात्रा” यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मी “गोव्यातील प्राचीन आणि जुन्या वारसा वृक्षांशी संबंधित “गोवा सैमिक दायज यात्रा” नावाची नवीन यात्रा सुरू केली. राजभवनाने आतापर्यंत गोव्यातील विविध तालुक्यांमध्ये पसरलेल्या अशा ३१ झाडांची ओळख पटविली आहे. ही झाडे स्थानिक समुदायांचे निसर्गाशी असलेले खोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध प्रतिबिंबित करतात आणि शतकानुशतके लोक त्यांची पूजा आणि संरक्षण करतात. ते लोक संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आणि निसर्ग आणि पर्यावरणासह लोकांच्या सामाजिक-सांस्कृतिक सहवासाचाही भाग आहेत. मी गोव्यातील बेटांना भेट देण्यास सुरुवात केली आहे जी गोव्यातील अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत कारण ही बेटं जगभरात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध व्हावीत. वामन वृक्ष कला” आणि “गोव्याची स्वर्गीय बेटे” जी गोवा आणि गोव्याच्या लोकांची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती, वारसा आणि परंपरा समोर आणतील. कोकणी, मराठी, संस्कृत आणि हिंदी भाषेत त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित व्हावे अशी इच्छा असलेल्या तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी “नयी पहल” हा साहित्यिक उपक्रम सुरू केला आहे.

या आनंदाच्या प्रसंगी, आपण गोव्याचा उत्साह आणि आनंद साजरा करूया. गोवा हे यापुढेही स्वप्ने साकार होण्याचे स्थान होवो. मी गोव्यातील लोकांना पुन्हा एकदा गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version