गोवा खबर

भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक : गोविंद गावडे

Published

on

Spread the love
गोव्यात ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषद’ !

गोवा खबर:जी२०’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहेभारताने विश्वाला योगआयुर्वेद आदी दिलेली देणगी आहेभारताला संगीतनृत्यकलासाहित्यचित्रशिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहेयाची सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहेभारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हेतर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास येत आहेभारताच्या या नवनिर्माणामध्ये आणि भारतला विश्वगुरुपदी विराजमान होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक आहेअसे आवाहन गोवा राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री श्रीगोविंद गावडे यांनी केले

ते ‘गोवा शासन’, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवननवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘सी२० परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होतेदाबोळीवास्कोगोवा येथील ‘राजहंस नौदल सभागृह’ येथे आयोजित ‘विविधतासमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी२० परिषदे’ला देशविदेशांतून आलेले मान्यवर आणि 350 हून अधिक तज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

     कार्यक्रमाचा प्रारंभ गोव्याचे सांस्कृतिक मंत्री श्रीगोविंद गावडे, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’च्या अध्यक्षा आणि ‘सी२०’ परिषदेच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा.डॉशशीबाला, ‘सिंगापोर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या मंडळाचे सदस्य श्रीमनीष त्रिपाठीहिंदी सिनेअभिनेत्री तथा लेखिका पूजा बेदी, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या शोध समन्वयक सौश्वेता क्लार्क आणि ‘स्पिरिच्युएल सायन्स रिसर्ज फाऊंडेशन’ या संकेतस्थळाचे संपादक श्रीशॉर्न क्लार्क यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून झालाया वेळी ‘सी-20 परिषदे’च्या प्राडॉशशीबाला यांनी ‘सी२० परिषदेचे’चे मानचिन्ह असलेले दोन ध्वज ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या सौश्वेता क्लार्क आणि श्रीशॉन क्लार्क यांना सुपुर्द केलेया वेळी सांस्कृतिक मंत्री श्रीगावडे यांच्या हस्ते ‘सी२०’ परिषदेचा ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’चा संदेश देणारा संगीतमय व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले.

आपण जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ध्येयापर्यंत घेऊन जाऊया ! – प्रमोद सावंतमुख्यमंत्रीगोवा

      यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉप्रमोद सावंत यांचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आलात्यात मुख्यमंत्री डॉप्रमोद सावंत म्हणाले, ‘‘जागतिक शांतता आणि जागतिक विकास या दृष्टीने गोव्यात होणार्‍या ‘जी-20’च्या बैठका या गोमंतकियांसाठी अभिमानाची गोष्ट आहेभारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी असल्याने ती ‘जी-20’ राष्ट्रांना ‘एकतासमृद्धी आणि समावेशकता’ या दिशेने घेऊन जाणार आहेभारतभरात या परिषदांच्या माध्यमातून आरोग्यविकासपर्यटन, ‘एनर्जी’, ‘स्टार्टअप’ आदी विविध विषयांवर बैठका होत आहेतपंतप्रधान माश्रीनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाचे नेतृत्व करू लागला आहे. ‘सी२० परिषदे’च्या माध्यमातून आपण जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या ध्येयापर्यंत घेऊन जाऊया.’’

श्रद्धावान आणि अश्रद्ध यांच्यामध्ये जगाचे विभाजन करता कामा नये ! – प्राडॉशशीबाला

 

      आज जगामध्ये संघर्षआतंकवाद आणि गोंधळ यांचे वातावरण आहेमनुष्य हा निसर्गाचा मालक बनला आहेसाम्यवादभांडवालवाद आणि व्यापारीवाद यांमुळे जगभरात अनादरतसेच विशिष्ट वर्गांना बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती वाढली आहेजगात वाढलेला हा संघर्ष त्यागतपकरुणा आणि प्रेम यांनी नष्ट होऊ शकतोभारतीय ऋषिमुनींनी प्रतिपादन केलेल्या शिकवणीमुळे भारतच जगाला दिशादर्शन करू शकतेआध्यात्मिक मार्गामध्ये जगातील सर्व समस्यांवर उपाय काढण्याची क्षमता आहेआपण श्रद्धावान (बिलिव्हर्सआणि अश्रद्ध (नॉनबिलिव्हर्सयांच्यामध्ये जगाचे विभाजन करता कामा नयेअसे प्रतिपादन ‘सी२० परिषदे’च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक प्राडॉशशीबाला यांनी केले.

मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वांवर चांगला परिणाम होतो ! – सौश्वेता क्लार्क

     भारतातील मंदिरे भारताच्या गौरवाशाली परंपरेला मूर्त रूप देताततसेच भारताच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देतातमंदिरांच्या अद्वितीयत्वाविषयी ही माहिती सांगत असतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोध समन्वयक सौश्वेता क्लार्क यांनी धनबाद (झारखंडयेथील स्वयंभू महादेव मंदिरातील स्वत:चे अनुभव कथन केलेसौश्वेता क्लार्क  म्हणाल्या कीमंदिराला भेट देणार्‍या भाविकांवर मग ते कुठल्याही धर्माचे असोततेथील सकारात्मक ऊर्जेचा त्यांच्यावर चांगला परिणाम होतोचहे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

     या वेळी प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये ‘सिंगापुर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या मंडळाचे सदस्य श्रीमनीष त्रिपाठी, ‘प्राचीन वारसा आणि तंत्रज्ञान यांद्वारे मानवतेची सामूहिक चेतना उंचावणारे’ श्रीअजित पद्मनाभगोवा येथील ‘श्रीनिवास सिनाई ढेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य तथा साहित्यिकलेखक प्रा.(डॉ.) मनोज कामत, ‘गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष श्रीमहेश पाटील, ‘संत ईश्वर फाऊंडेशन’च्या राष्ट्रीय सचिव वृंदा खन्ना, ‘आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ञ’ डॉनिशी भट्ट, ‘पार्क हॉटेल्स’चे महाव्यवस्थापक श्रीसौरभ खन्नासेलबोटीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय कॅप्टन दिलीप डोंडे यांचेही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि सादरीकरण झाले.

Trending

Exit mobile version