गोवा खबर

पावसाळ्यात रस्ते खोदण्यावर उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांची बंदी

Published

on

Spread the love

गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यात पावसाळ्यात कोणताही रस्ता किंवा रस्त्याचा भाग लेखी परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती, एजंसी किंवा संघटनेस खोदण्यावर बंदी लागू केली आहे. तसेच सध्या संबंधित व्यक्ती, एजंसीने रस्ते किंवा रस्त्याचा भाग खोदलेला असल्यास तो लवकरात लवकर दुरूस्त करण्याचा आदेश दिला आहे.

            हा आदेश १ जून २०२३ पासून लागू झाला असून तो ६० दिवस पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर कायदेशिर कारवाई केली जाईल.

Trending

Exit mobile version