गोवा खबर

राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर: राष्ट्रीय डेंग्यू दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आरोग्य केंद्राच्या परिषदगृहात संपन्न झाला. सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रमाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डेंग्यूला हरविण्यासाठी भागीदारी हार्नेस ही यावर्षीची संकल्पना आहे.

कार्यक्रमात बोलतांना राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे कळल्यास लवकर बरे होण्यास मदत होते असे सांगितले. “उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे आणि जनजागृतीमुळे डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. डेंग्यू रोग प्रतिबंधक मोहिमेचे आयोजन, शिबिरे आणि सर्वसामान्यांना माहिती देणारी पत्रके पाठवून वैद्यकीय कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

वेळोवेळी पर्यवेक्षण आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केल्याने डासांची पैदास कमी होऊ शकते.” असे त्या पुढे म्हणाल्या. डॉ. कल्पना यांनी पुढे सांगितले की, साचलेल्या पाण्यात, बांधकामाजवळील भागात डासांची उत्पत्ती होते असे सांगितले. गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजिता पै यांनी वैद्यकीय कर्मचार्‍यांना डेंग्यू आजारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना आणि पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित केले. समाजाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करणाऱ्या उत्साही वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

मडगावचे नगराध्यक्ष श्री दामोदर शिरोडकर यांनी गोव्यातील डेंग्यूचे रुग्ण कमी करण्यासाठी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांचे अभिनंदन केले.

यावेळी सहाय्यक शिक्षण संचालक श्री मेलविन डिकोस्ता, इतर वैद्यकीय अधिक्षक आणि नोडल अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version