गोवा खबर: स्टेट बँक ऑफ इंडियाने ताज विवांता पणजी येथे राज्यस्तरीय बँकर्स समितीची १२१ वी बैठक यशस्वीपणे आयोजित केली आहे. बैठकीचा प्राथमिक उद्देश म्हणजे राज्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी भविष्यातील धोरणांवर चर्चा करणे हा होता.
बैठकीच्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी औद्योगिक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना या कर्ज कार्यक्रमाची लवकरच अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. त्यांनी विविध कार्यक्रमांच्या आऊटसोर्सिंगसाठी बँक पॅनेलमेंट स्थापन करण्याच्या सरकारच्या योजनांवर भर दिला, तसेच बँकांना पंतप्रधानांनी सुरू केलेल्या बँकिंगशी संबंधित योजनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. डॉ. सावंत यांनी अलीकडच्या काळात बँकांनी केलेल्या कौतुकास्पद वाढीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल आयएएस यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला आणि अजेंडा आणि त्याच्याशी संबंधित आव्हाने यावर अंतर्दृष्टी, उपाय आणि मार्गदर्शन केले. त्यांनी वरिष्ठ व्यावसायिकांनी त्यांच्या कनिष्ठांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रेरित करण्याच्या महत्त्वावर भर दिला, तसेच व्यवस्थापकांना अधिक सक्रिय दृष्टीकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.
गोवा सरकारचे प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदेवेलू आयएएस यांनी अंदाजे १.७ लाख कोटींच्या उत्पादन ठेवींची पातळी ओलांडल्याबद्दल बँकांचे कौतुक केले. राज्यातील वाढत्या आर्थिक घडामोडीबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी या वाढीसाठी आणखी योगदान द्यावे असे आवाहन केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती. स्मिता सी. कुमार यांनी बँकांनी स्वयं-विश्लेषण करण्याची आणि कर्ज देण्याच्या पद्धती सुधारण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी बँकांना कृषी क्षेत्रात आर्थिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे अधिक गुंतवणूक आकर्षित होईल असे ते म्हणाले.
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) चे उपमहाव्यवस्थापक श्री व्ही.व्ही. देशपांडे यांनी आपले अनुभव सांगितले आणि खाजन जमिनींचे मत्स्य तलावात रूपांतर करण्यासह विविध योजनांवर प्रकाश टाकला.
वित्त सेवा खात्याचे संचालक श्री कार्तिकेय मिश्रा आयएएस यांनी योजनांचा आढावा घेतला. आणि डेटा सादर केला, तसेच गोव्यातील बँकिंग क्षेत्राला भेडसावणाऱ्या चिंता आणि अडचणींचे निराकरण केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक आणि एसएलबीसीचे संयोजक, श्री जोगेंद्र पाल सिंग, यांनी २०२२-२०२३ या तिमाहीत बँकांच्या कामगिरीचे सादरीकरण केले.
एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक श्री बिकाश बासुमातारी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विविध बँका आणि सरकारी संस्थांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.