गोवा खबर: गोवा विद्यापीठात स्कूल ऑफ फिजिकल अँड अप्लाइड सायन्सच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कॉम्प्युटर नेटवर्किंगमधील पदवी अभ्यासक्रम प्रवेश खुला करण्यात आला असून इच्छुक उमेदवारांनी तपशिलांसाठी गोवा विद्यापीठाच्या www.unigoa.ac.in या वेबसाइटला भेट द्यावी.
कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक किंवा कोणत्याही शाखेतून उमेदवार उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० मे २०२३ आहे . प्रवेश पोर्टलची लिंक:https://tinyurl.com/mruvt72t .
योग्यता मूल्यमापन/मुलाखत १जून२०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंग, स्कूल ऑफ फिजिकल अँड अप्लाईड सायन्स (SPAS) गोवा विद्यापीठात तात्पुरती घेतली जाईल. गुणवत्तेवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची यादी ५ जून २०२३ पर्यंत गोवा विद्यापीठाच्या वेबसाइटवर तात्पुरती अधिसूचित केली जाईल. अभ्यासक्रमास १२ जून २०२३ पासून सुरवात होईल.