कोकणी चित्रपट ते सुवर्ण गोवा ः गोवा वारसा महोत्सव 2023 मध्ये सांस्कृतिक महोत्सव
गोवा खबर: गोवा वारसा महोत्सव हा समृद्ध बहुपदरी सांस्कृतिक वारसा साजरा करणारा गोवा राज्याचा महोत्सव आहे. हा महोत्सव जगभरातील हजारो जणांना खेचून आणतो, ते हा लहरी निर्माण करणारा, रंगतदार महोत्सव नजरेत साठवण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी येतात. या महोत्सवात पारंपरिक गोमंतकीय कला प्रकार, संगीत, नृत्ये, खाद्यसंस्कृती, हस्तोद्योग यांचे प्रदर्शन होत असल्याने स्थानिक गोमंतकीयांना एकमाद्वितीय प्रथा परंपरा सादर करण्यास मंचही उपलब्ध होतो. यंदाचा महोत्सव हा नवीन नाविन्यपूर्ण कार्यक्रम, अधिक रोमांचक आणि समृद्ध अनुभव देणारा आहे. अभ्यागताना हा महोत्सव समृद्ध वारशाचा खजिन्याची झलक दाखवणारा आहे. पर्यटन खात्याकडून आयोजित तीन दिवसीय महोत्सव नयनरम्य अशा उत्तर गोव्यातील साळगाव गावात 28 ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे.
गोवा वारसा महोत्सव आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सार प्रतिबिंबत करत, गोव्याला अद्वितीय बनवणाऱ्या प्रथा परंपरांचे प्रदर्शन करेल. सादरीकरण, कला प्रकार आणि स्वयंपाकाचा आनंद यांचे येथे होणारे प्रदर्शन म्हणजे स्थानिकांचे अतुल्य कौशल्य आणि सर्जनशीलता यांचाच पुरावा आहे. गोमंतकीय आत्म्याचे हे सादरीकरण म्हणजे एक जीवंत अनुभवच आहे असे केंद्रीय पर्यटन, बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यटन माहिती तंत्रज्ञान, छपाई व लेखनसामग्रीमंत्री श्री. रोहन खंवटे, पशुवैद्यकीय पशुसंवर्धन, कारखाने व बाष्पकमंत्री श्री नीळकंठ हळर्णकर होते.
गोवा वारसा महोत्सवाचा भाग होण्याचा मला आनंद होत आहे. जिथे गोव्याचे सौंदर्य व वारसा जीवंत होत आहे. महोत्सव केवळ वारसा जपत नाही तर कलाकारांना कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी मंच उपलब्ध करतो. पारंपरिक नृत्ये ते हस्तकला, विविध कार्यक्रम यातून अतुल्य कलाकारांच्या क्षमतांचे गोमंतकीयांसमोर प्रदर्शन होते. यातून हा महोत्सव उपस्थितांवर आपली छाप सोडल्याशिवाय राहणार नाही असे रोहन खंवटे म्हणाले.
अन्य़ मान्यवरांत शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, हळदोण्याचे आमदार कार्लोस आल्वारीस फेरेरा, पर्यटन सचिव संजीव आहुजा (आयएएस), पर्यटन संचालक सुनील अंचीपका (आयएएस), गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मणेरकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शाह आणि स्थानिक पंच यांचा समावेश होता.
गोवा वारसा महोत्सव 2023 च्या उद््घाटन सोहळ्यात ब्रास बॅण्ड, फेटा बांधणे, स्वागतासाठी लोकवाद्यांसहीत मिरवणूक यांचा समावेश होता. फोंडा येथील कलारंग गटाने पाहुण्यांचे स्वागत रोमटामेळ, ढोल ताशा आणि घोडेमोडणीच्या सादरीकरणाने पारंपरिक पद्धतीने केले. मुख्य मंचावर जाण्याआधी पाहुण्यांना वारसा महोत्सवात असलेल्या विविध स्टॉल्सना भेटी देण्याची संधी मिळाली. मंचावर दीपप्रज्वलन करण्याआधी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यानिमित्ताने खास फुगेही आकाशात सोडण्यात आले.
गोवा वारसा महोत्सवात फोंड्याच्या कलारंग गटाने पारंपरिक गोमंतकीय लोकनृत्ये सादर केली यात नमन, देखणी, धुळपद, घोडमोडणी, तालगडी,, गोफ, मोरुलो आदींचा समावेश होता. बोलके ड़्रमचे सादरीकरण कार्लोस गोन्सालवीस यांनी केले. त्यांच्या तालवाद्य सादरीकरणाने महोत्सवात अव्दितीय अशी भर पडली. त्याशिवाय गोमंतकीय वाद्यवृंद पर्पल रेन यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना संगितीक सैर करता आली. या सादरीकरणांनी महोत्सवात चैतन्य निर्माण केले.
गोवा वारसा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोकणी चित्रपट आमचे नशीबचे प्रदर्शन, पाककृती स्पर्धा आदींचा समावेश आहे. स्थानिक आमदारांच्या सहकार्याने याचे आयोजन केले आहे. महोत्सवात भांगराळे गोय हा उपशास्त्रीय कार्यक्रम सादर होईल त्यातून गोमंतकीय गोमंतकीय लोक जीवनशैली, उत्सव, संस्कृती यांचा सांगितीक दर्शन डॉ. पुर्णानंद च्यारी घडवणार आहेत. नामंवंत गोमंतकीय गायिका लॉर्ना आणि तीचे सहकारी यांच्या सादरीकरणानंतर इम्पेरीयल वाद्यवृंद सायंकालीन मनोरंजन करेल. यावेळी गोव्यातील समृद्ध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक वारशाचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
महोत्सव गोमंतकीय समृद्ध संस्कृती व वारसा ठळकपणे मांड़तानाच तेथे भेट देणाऱ्यांना याचा अद्वितीय अनुभवात डुंबण्याची संधी देणार आहे. गोमंतकीय परंपरा आणि वारसा तसेच सांस्कृतिक मनोरंजन याचा अनुभव घेण्यासाठी या महोत्सवास भेट दिलीच पाहिजे.