गोवा खबर

निवडणूक काळात दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

Published

on

Spread the love

गोवा खबर:कर्नाटक विधानसभेच्या २०२३ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काणकोण तालुक्‍यातील पोळे गाव, धारबांदोडा तालुक्‍यातील मोले गाव आणि सत्तरी तालुक्‍यातील सुर्ला गावाच्‍या हद्दीपासून ०५ किमी आणि कर्नाटकच्‍या सीमेच्‍या हद्दीच्‍या परिसरात दारूची  वाहतूक करण्यास  किंवा  जवळ  बाळगण्यास  निर्बंध लागू केले असून  कोणतीही  व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा  विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील  किंवा जवळ बाळगू शकतात.

वरील निर्बंध ८ मे २०२३ च्या संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून १० मे २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.

 दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

कर्नाटक विधानसभेच्या २०२३ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या सीमेपासून ५  किमीच्या परिघात येणारे काणकोण तालुक्यातील पोळे गाव, धारबांदोडा तालुक्यातील मोले आणि सत्तरी तालुक्यातील सुर्ला गाव या परिसरातील सर्व परवानाधारक “दारूची दुकाने विक्रीसाठी” ०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ते १० मे २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.

Trending

Exit mobile version