गोवा खबर

निवडणूक काळात दारूच्या वाहतुकीवर निर्बंध

Published

on

Spread the love

 गोवा खबर:फोंडा आणि सांखळी नगरपालिकेच्या निवडणूकीमुळे दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा  विदेशी दारूची पाऊण बाटली आणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील  किंवा जवळ बाळगू शकतात.

वरील निर्बंध ४, ५ आणि ७ मे २०२३  रोजी संपूर्ण गोवा राज्यात लागू राहील.

 दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

  सांखळी आणि फोंडा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी ४, ५ आणि ७ मे २०२३ रोजी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.

Trending

Exit mobile version