गोवा खबर: दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फोंडा नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा, प्राणघातक शस्त्रे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी नेण्यास मनाई केली आहे.
फोंडा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शस्त्रे परवाना धारकांनी २१ एप्रिल २०२३ रोजी पूर्वी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परवाना धारकांना मतमोजणीपासून पाच दिवसांनी म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर जमा केलेली सर्व बंदुके परत केली जाईल.