गोवा खबर: आरोग्य सेवा संचालनालयाने मलेरियाचे ओझे नियंत्रित करण्यासाठी आणि कमी करण्याच्या धोरणांवर भर देण्यासाठी दरवर्षी २५एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस पाळला जातो अशी माहिती दिली. या वर्षाची संकल्पना आहे “टाईम टू डेलिवर झिरो मलेरीया. गुंतवणूक, नवीन, अंमलबजावणी करा”. हा दिवस साजरा करण्यासाठी राज्यभर जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.
२१एप्रिल २०२३रोजी सकाळी १०.१५वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.